मर्हेगाव येथे शिवजयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:53 IST2021-02-23T04:53:12+5:302021-02-23T04:53:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खराशी : येथून जवळच असलेल्या मर्हेगाव येथे शिवक्रांती युवाशक्ती सांस्कृतिक मंडळाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ...

Shiva Jayanti celebrations at Marhegaon | मर्हेगाव येथे शिवजयंती उत्साहात

मर्हेगाव येथे शिवजयंती उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क

खराशी : येथून जवळच असलेल्या मर्हेगाव येथे शिवक्रांती युवाशक्ती सांस्कृतिक मंडळाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, महिला व पुरुष गट कब्बडी स्पर्धा, गजर शिव जन्मोत्सव जल्लोषाचा महारॅली, आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून खराशीचे उपसरपंच सुधन्वा चेटूले तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच देवकन बेंदवार, घनश्याम शेंडे, तुलाराम राऊत, आर. सी. फुल्लूके, भास्कर मदनकर, शामराव बेंदवार, पुरुषोत्तम दृगकर, सुखदेव गोंदोळे उपस्थित होते. प्रास्तविक ओमेंद्र तरोणे यांनी तर सूत्रसंचालन विकास लांजेवार यांनी केले. मोरेश्वर ब्राम्हणकर यांनी आभार मानले. कार्यक्रमांसाठी हरिश शेंडे, भोलाराम लांजेवार, विलास शेंडे, गुलशन गोटेफोडे, विवेक ब्राम्हणकर, कमलेश बनकर यांनी सहकार्य केले.

Web Title: Shiva Jayanti celebrations at Marhegaon