शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शेप महाबचत गटाने केला २.८ कोटी रूपयांचा अपहार

By admin | Updated: September 14, 2016 00:32 IST

शेप महाबचतगटाच्या माध्यमातून भंडारा येथील मोरेश्वर मेश्राम यांच्यासह १५ जणांनी कोट्यवधी रूपयांचा अपहार करून फसवणूक केली.

साकोलीत तक्रार : मेश्रामला अटक करण्याची मागणीसाकोली : शेप महाबचतगटाच्या माध्यमातून भंडारा येथील मोरेश्वर मेश्राम यांच्यासह १५ जणांनी कोट्यवधी रूपयांचा अपहार करून फसवणूक केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करण्यात यावी, या आशयाची तक्रार कुंभली येथील किशोर रंगारी यांच्यासह ३३ जणांनी साकोली पोलीस ठाण्यात केली आहे.शेप महाबचतगटाच्या साकोली शाखेमध्ये आपण प्रभारी पदावर मानधनावर कार्यरत होतो. २५ मार्च १९९८ रोजी ११ जणांनी मिळून अभिनय अभिरुची कला व बहुउद्देशिय संस्था गडचिरोली ही सामाजिक सहकारी संस्था स्थापन केली. यात शेप महाबचतगट भंडारा, गोंदिया, नागपूर गडचिरोली त्यात्या जिल्ह्यात कार्यरत होती. या महाबचत गटात संयोजक शाखा प्रभारी, संपर्क अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, व्यवस्थापक, मुख्य प्रवर्तक व मुख्य व्यवस्थापकीय संचालक अशी साखळी होती. त्यानुसार खातेदारांकडून दरमहा ६० रुपये ते ४९९ रूपये व ५०० ते १० हजार पर्यंत ठेवीच्या माध्यमातून एक हजार ते त्यावरील पैसे जमा करुन शेप महाबचत गटाच्या भंडारा येथील मुख्य कार्यालयात जमा करण्यात येत होती. त्यानंतर ही रक्कम शेप महाबचत गटाचे मुख्य प्रवर्तक मोरेश्वर मेश्राम यांच्या खात्यात जमा होत होती. मेश्राम हे शेप महाबचतगटाचे सर्वेसर्वा असुन त्यांनी शेप महाबचतगटात चारही जिल्ह्यात शाखा कार्यालये सुरु केले. शेपमहाबचतगटाच्या माध्यमातून जमा झालेला पैसा व्यावसायिक कंपन्या स्थापन करून त्या कंपन्यामधून मिळणाऱ्या नफ्याच्या माध्यमातून ठेवीदारांचे पैसे लाभासह परत करू, असे मेश्राम यांनी सांगितले होते. त्यानंतर मेश्राम यांनीशेप इंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमि., शेप अ‍ॅग्रो प्रॉडक्ट अ‍ॅण्ड मार्केटिंग प्रा. लि., एस. व्हीजन प्रायवेट लिमी. शेप प्रिंटींग अ‍ॅण्ड पब्लिकेशन प्राय. लिमि. या खाजगी कंपन्या स्थापन केल्या. या पैशातून गणेशपूर, धारगाव, आकेश्वर, खैरी, घानोड, झाडगांव या ठिकाणी मालमत्ता खरेदी केली. ठेवीची मुदत संपल्यानंतर खातेदारांनी पैसे मागितले असता टाळाटाळ सुरू करून मेश्राम हे फरार झाल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. साकोली शाखेमधून २ कोटी ८ लाख १८ हजार ६८० रूपयांच्या ठेवीच्या रकमेचा अपहार झाला आहे. यामुळे मोरेश्वर मेश्राम यांच्यासह गडचिरोली येथील १५ जणांचा तक्रारीत समावेश आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून या सर्वांना अटक करून खातेदारांचे पैसे मिळवून देण्याची मागणी किशोर रंगारी यांच्यासह ३८ जणांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)