गतीमंद माऊलीच्या चिमुकल्या अंकीताला हवी प्रेमाची सावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:00 IST2020-08-27T05:00:00+5:302020-08-27T05:00:53+5:30

आईची माया वेडी असते असे म्हणतात. ती अंकीताला सोबत घेऊन गावभर फिरायची. मिळालेल्या भीकेतून तिला जगवायची. या चिमुकलीचे संपूर्ण आयुष्य गतीमंद आईसोबत जाईल असे कुण्या सहृदयाला वाटले. त्याने पुढाकार घेतला. अंकीताला निवासी आश्रमशाळेत दाखल केले. सध्या ती सहाव्या वर्गात शिकत आहे. मात्र इकडे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी रेखाचा अन्नपाण्यावाचून लाखांदूरमध्ये मृत्यू झाला. अंकीता खऱ्या अर्थाने उघड्यावर आली.

The shadow of love that Chimukalya Ankita of Gatimand Mauli wants | गतीमंद माऊलीच्या चिमुकल्या अंकीताला हवी प्रेमाची सावली

गतीमंद माऊलीच्या चिमुकल्या अंकीताला हवी प्रेमाची सावली

ठळक मुद्देमातृछत्र हरविले : एकाकी चिमुकलीपुढे भावी आयुष्याचा प्रश्न

दयाल भोवते।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : जन्मत:च तीला गतीमंद आईच्या कुशीची उब लागली. आईने मिळविलेल्या भिकेतून ती वाढली. ती सक्षम व सुदृढ व्हावी या हेतूने काहींनी पुढाकार घेतला. तिला शाळेत दाखल केले. गत आठवड्यात गतीमंद आईचे निधन झाले. तिची सावलीच हरविली. सहाव्या वर्गात शिकणाऱ्या या चिमुकलीपुढे भावी आयुष्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. आता तिला हवी आहे समाजाकडून मायेची सावली.
अंकीता वसाटे असे या दहा वर्षीय बालिकेचे नाव आहे. तिची आई रेखा गतीमंद होती. लाखांदूर शहरात फिरून ती आपल्या पोटाची खडगी भरायची. अशातच तिच्या वेलीवर अंकीता नावाचे फुल उमलले. गतीमंद असल्याने तिला तिचेच भान नाही तर मुलीचे कुठून राहणार. मात्र आईची माया वेडी असते असे म्हणतात. ती अंकीताला सोबत घेऊन गावभर फिरायची. मिळालेल्या भीकेतून तिला जगवायची. या चिमुकलीचे संपूर्ण आयुष्य गतीमंद आईसोबत जाईल असे कुण्या सहृदयाला वाटले. त्याने पुढाकार घेतला. अंकीताला निवासी आश्रमशाळेत दाखल केले. सध्या ती सहाव्या वर्गात शिकत आहे. मात्र इकडे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी रेखाचा अन्नपाण्यावाचून लाखांदूरमध्ये मृत्यू झाला. अंकीता खऱ्या अर्थाने उघड्यावर आली. आता ती एकाकी आणि निराधार झाली आहे. समाजाने पुढाकार घेऊन तिच्या वाळवंट झालेल्या जीवनात हिरवळ फुलविण्याची गरज आहे.

Web Title: The shadow of love that Chimukalya Ankita of Gatimand Mauli wants