तुमसर बाजारपेठेत बंदोबस्त

By Admin | Updated: September 9, 2016 01:26 IST2016-09-09T01:26:42+5:302016-09-09T01:26:42+5:30

जुन्या गंज बाजारात एका गावगुंडाने कापड व्यावसायीक व दुकानातील महिला नोकरावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला.

Settlement in the Tasar market | तुमसर बाजारपेठेत बंदोबस्त

तुमसर बाजारपेठेत बंदोबस्त

कारवाईला सुरूवात : असामाजिक तत्त्वावर जरब बसणार
तुमसर : जुन्या गंज बाजारात एका गावगुंडाने कापड व्यावसायीक व दुकानातील महिला नोकरावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला. भितीमुक्त वातावरणकरिता बाजार परिसरात गुरूवारपासून सायंकाळ ते रात्रीपर्यंत पोलीस गस्ती पथक तैनात करण्यात आले.
मुख्य बाजार परिसरातील व्यापाऱ्यांनी पोलीस निरीक्षक, आमदार चरण वाघमारे, उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने ही कारवाई तात्काळ करण्यात आली. जुन्या गंज बाजार परिसरात शहरातील मुख्य विविध दुकाने आहेत. चार दिवसापुर्वी एका गावगुंडाने कपडा व्यावसायीक व दुकानातील महिला नौकरावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे बाजार परिसरात एकच खळबळ माजली होती. दुकानदार, महिला तथा ग्राहकांना भिती निर्माण झाली होती. असामाजिक तत्वांचा वाढता वावर यावर आळा घालण्याची विनंती व्यापारी संघटनेने पोलीस प्रशासन व तालुका प्रशासनाकडे केली. गुरूवार संध्याकाळ ६ ते रात्री दुकाने बंद होईपर्यंत पोलीस गस्ती पथक बाजार परिसरात तैणात करण्याचा निर्णय पोलीस निरीक्षक राजेंद्र शेट्ये यांनी घेतला. सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. महिला खरेदीकरिता घराबाहेर पडतात. अनेक दुकानात महिला नौकर आहेत. त्यांच्या सुरक्षेकरिता उपाययोजना करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला. बुधवारी आ. चरण वाघमारे यांनी संबंधित दुकानाला भेट देवून चौकशी व विचारपूस केली. पोलीस प्रशासनाला बाजार व शहरात पोलीस गस्त वाढविण्याचे निर्देश दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Settlement in the Tasar market