लाखनी येथील सर्व्हिस रस्ता डांबरीकरणाला दोन दिवसात तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 06:00 AM2020-02-23T06:00:00+5:302020-02-23T06:00:44+5:30

लाखनी येथील राष्ट्रीय महामार्गावर जेएमसी कंपनीद्वारे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. सहा वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले होते. त्यावेळी सर्व्हीस रस्ता तयार करण्यात आला होता. आता उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे सर्व वाहतूक सर्व्हीस रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. रस्त्याच्या मधोमध मोठाले पिलर तयार करणे सुरु आहे. त्यामुळे अवजड वाहतूक या सर्व्हीस रस्त्यावरून वळती झाली आहे.

The service road at Lakhni should be demolished in two days | लाखनी येथील सर्व्हिस रस्ता डांबरीकरणाला दोन दिवसात तडे

लाखनी येथील सर्व्हिस रस्ता डांबरीकरणाला दोन दिवसात तडे

Next
ठळक मुद्देधुळीचा त्रास । उड्डाणपुलाच्या बांधकामाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : राष्ट्रीय महामार्गावर लाखनी शहरात उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु असून त्यासाठी सर्व्हिस रस्त्यावरून वाहतूक वळती करण्यात आली. उखडलेल्या सर्व्हीस रस्त्यावर दोन दिवसापूर्वी डांबरीकरण करण्यात आले. आता सर्व्हीस रस्त्याच्या डांबरीकरणाला तडे गेले असून वाहनधारकांना येथून जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यातच धुळीचाही त्रास सहन करावा लागतो.
लाखनी येथील राष्ट्रीय महामार्गावर जेएमसी कंपनीद्वारे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. सहा वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले होते. त्यावेळी सर्व्हीस रस्ता तयार करण्यात आला होता. आता उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे सर्व वाहतूक सर्व्हीस रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. रस्त्याच्या मधोमध मोठाले पिलर तयार करणे सुरु आहे. त्यामुळे अवजड वाहतूक या सर्व्हीस रस्त्यावरून वळती झाली आहे.
सदर रस्त्याला तडे गेले असून धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावरील गिट्टी व दगडामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. दोन दिवसापूर्वी सर्व्हीस रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र दोनच दिवसात ते उखडले. पुन्हा गिट्टी रस्त्यावर आली आहे.
डांबरीकरणाला तडे गेल्याने अपघाताची भीती वाढली आहे. वाहनाच्या टायरखाली आलेली गिट्टी वेगाने उसळत असून त्यामुळे पादचाऱ्यांना अपघाताची भीती आहे.

Web Title: The service road at Lakhni should be demolished in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.