शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
2
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
3
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
4
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
5
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
6
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
7
मागच्या वेळी कुटुंबातील पाचही मुलांची एमबीबीएससाठी निवड; यावेळी मुलासाठी 'नीट'चा पेपर १० लाखांत घेतला
8
"तेरा गम मेरा गम एक जैसा सनम..." शाहरुख खान-प्रीती झिंटाच्या संघावर आली हे गाणं गुणगुणण्याची वेळ
9
बाप रे! एसी सुरू करताच थंड हवेऐवजी बाहेर आले ३ विषारी साप; समोरचे दृश्य पाहून कुटुंबाची उडाली झोप
10
कर्ज वेळेपूर्वी फेडताय? थांबा, क्रेडिट स्कोअरवर होईल परिणाम
11
ओठ सुजले, अंगावर लाल चट्टे... हळद लागताच कपलची तब्येत बिघडली, नवरी थेट व्हेंटिलेटरवर
12
Russian Oil Imports: भारताची धाकधूक वाढली! रशियन तेलावरील अमेरिकन सवलत १६ मे रोजी संपणार; रिफायनरीजसमोर पेच
13
IPL 2026: विकेट नको, फक्त दहशत हवी! गुजरात टायटन्सचा 'नेहरा पॅटर्न', फलंदाजांच्या मनात भरली धडकी
14
दिलजीत दोसांझ भारतीय नाही? ४ वर्षांआधीच स्वीकारलं अमेरिकेचं नागरिकत्व; का होतेय चर्चा?
15
NEET पेपर लीकचा 'मास्टरमाइंड' शुभम नाही तर कोण? राजस्थान ते नाशिक धागेदोरे; २ ते ५ लाखांत फुटला पेपर!
16
Katie Archibald: रुग्णांची सेवा करण्यासाठी स्पोर्ट्स करिअरवर सोडलं पाणी; स्टार खेळाडूची जगभरात चर्चा!
17
कोकणात जाण्यासाठी १२ तास ‘यातनांचा प्रवास’, त्याआधी १० तास प्लॅटफॉर्मवर मुक्काम
18
Ritual : जेवणाआधी 'हा' श्लोक म्हटल्याने तुमची Over Eating ची सवय मोडेल, निरोगी आयुष्य लाभेल!
19
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
20
पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळेच; 'जेजे'ने पोलिसांना अहवाल दिल्याची सूत्रांची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

गराडासह पाच गावे सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST

सदर भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करण्यात आले. सीमा आवागमनासाठी बंद करण्यात आल्या आहेत. सदर परिसरात घरोघरी रुग्ण तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी एक डॉक्टर, आशा वर्कर नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांच्या परिवारातील, संपर्कातील सर्वांची तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी सांगितले.

ठळक मुद्देकोरोना रुग्ण आढळला : संपर्कातील सहा व्यक्तींचे संस्थांतर्गत अलगीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद सोमवारी झाली असून खबरदारीच्या उपाययोजना म्हणून भंडारा तालुक्यातील गराडासह पाच गावे पाच गावे सील करून पाच किलोमीटरचा परिसर बफर झोन घोषीत करण्यात आला. कोरोनाबाधीत व्यक्तीच्या संपर्कातील सहा व्यक्तींना संस्थेत अलगीकरण करण्यात आले असून त्यांच्या घश्यातील स्वॅबचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
लॉकडाऊन घोषीत झाल्याच्या ३५ दिवसानंतर भंडारा जिल्ह्यात ४५ वर्षीय महिला कोरोनाग्रस्त असल्याचे सोमवारी आलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. ग्रीनझोन राखण्यात आतापर्यंत प्रशासनाला यश आले. मात्र सोमवारी कोरोनाग्रस्त रुग्णाची नोंद झाली. सदर महिला भंडारा तालुक्यातील गराडा बुजरूक येथील रहिवासी असून सदर गावाच्या परिसरातील गराडा खुर्द, मेंढा, बासोरा, बोरगाव बुज. (पुर्नवसन) हा परिसर पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आला आहे. सदर भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करण्यात आले. सीमा आवागमनासाठी बंद करण्यात आल्या आहेत. सदर परिसरात घरोघरी रुग्ण तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी एक डॉक्टर, आशा वर्कर नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांच्या परिवारातील, संपर्कातील सर्वांची तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी सांगितले. सदर महिलेच्या निकटसंपर्कात आलेल्या सहा व्यक्तींना संस्थेत अलगीकरण करण्यात आले असून त्यांच्या घश्यातील स्वॅबचे नमूने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. विशेष म्हणजे कोरोनाग्रस्त आढळलेल्या महिलेचा प्रवासाचा कोणताही इतिहास नाही. त्यामुळे तिला कोणामुळे कोरोना संसर्ग झाला याचा शोध प्रशासन घेत आहे.

६९ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा
भंडारा जिल्ह्यातून आतापर्यंत ३५३ नमूने तपासणीसाठी पाठविले असून २८३ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आणि एक नमूना पॉझिटिव्ह आला आहे. रविवारी १३ व्यक्तींचे आणि यापुर्वी पाठविलेल्या असे ६९ व्यक्तींच्या अहवालाची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. तर तीर्व श्वासदाह अंतर्गत ७४ व्यक्ती दाखल असून या सर्वांचे नमूने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यापैकी ६७ नमूने निगेटिव्ह आले असून सहा अहवालांची प्रतीक्षा आहे.

आयसोलेशन वॉर्डात १९ व्यक्ती
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात १९ व्यक्ती दाखल असून येथून ९८ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. तर सोमवारी ५७ व्यक्तींना हॉस्पिटल क्वारंटाईन करण्यात आले आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मोहाडी येथील कोवीड केअर सेंटरमध्ये १४ व्यक्तींना दाखल करण्यात आले असून त्या सर्वांचे नमूने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. ते सर्व अहवाल सध्या अप्राप्त आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या