भंडाऱ्यात खराब रस्त्यांमुळे स्कूल व्हॅन पुलावरून कोसळली; एक गंभीर, व्हॅनमध्ये होते १३ विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 13:14 IST2025-10-17T13:14:04+5:302025-10-17T13:14:45+5:30

व्हॅनमध्ये होते १३ विद्यार्थी, पाच जखमी : विद्यार्थ्याची बास्केट स्टिअरिंगवर आदळली अन् घडला अनर्थ

School van falls off bridge due to bad roads in Bhandara; One seriously injured, 13 students in van | भंडाऱ्यात खराब रस्त्यांमुळे स्कूल व्हॅन पुलावरून कोसळली; एक गंभीर, व्हॅनमध्ये होते १३ विद्यार्थी

School van falls off bridge due to bad roads in Bhandara; One seriously injured, 13 students in van

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा / खमारी :
तालुक्यातील बेरोडी येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई कॉन्व्हेंटमधील विद्यार्थ्यांना घरी सोडण्यास निघालेली व्हॅन भिलेवाडा ते खमारी मार्गावरील सुरेवाडा पुनर्वसन गावाशेजारील पुलावरून १० फूट खाली कोसळली. या अपघातात एका विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली, तर ५ किरकोळ जखमी झाले. जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात दुपारी १:४५ वाजताच्या सुमारास घडला.

गंभीर जखमी विद्यार्थ्यांचे नाव गर ईश्वर मेश्राम (७, माटोरा) असे असून दाखल असलेल्या अन्य जखमींमध्ये अन्वेश दीपक बेदरकर (५, मांडती), सान्वी दीपक बेदरकर (६, मांडवी), अन्वेश भोयर (६, माटोरा), सानिध्या रामप्रकाश चोपकर (७, खमारी), रुद्राणी उमेश बेदरकर (७, मांडवी) यांचा समावेश आहे. वाहनचालक महेश पंजाब मेश्राम (२८, मांडवी) याच्या खांद्यालाही दुखापत झाली आहे. या अपघातग्रस्त व्हॅनमध्ये ५ ते १० वयोगटातील १३ विद्यार्थी होते. अन्य विद्यार्थी किरकोळ जखमी असल्याने त्यांना पालक आपल्यासोबत घेऊन गेले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई कॉन्व्हेंटच्या संचालकांनी बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी व्यवस्थापनाकडून व्हॅनची व्यवस्था केली होती. त्याचे दरमहा भाडे पालक देत आहेत. दुपारी १:३० वाजता सुटी झाल्यावर या एमएच ४९ बीबी ५८६४ क्रमांकाच्या व्हॅनमधून मांडवी, माटोरा व खमारी गावातील १३ विद्यार्थी गावाकडे निघाले होते. चालक महेश पंजाब मेश्राम (२८, मांडवी) होता. दरम्यान सुरेवाडा पुलाजवळ खोल खड्डे असल्याने भरधाव वेगातील वाहन उसळले. चालकाच्या बाजूला बसलेल्या एका विद्यार्थ्याची बास्केट स्टेअरिंगला आदळली. मुले व बास्केट सांभाळण्याच्या प्रयत्नात वाहन अनियंत्रित झाले व काही कळण्याच्या आत वाहन मुख्य पुलाआधी असलेल्या सुरक्षा भिंतीचे अवरोधक तोडून १० फुट खोल कोसळले. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. ठाणेदार घटनेची माहिती मिळताच कारधा गोकुळ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

पालकांत आक्रोश, शिक्षक चिंतेत

घटनेची माहिती मिळताच शाळेचे शिक्षक व पालकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे रुग्णालयात एकच गर्दी दिसून आली. मुलांची चिंताजनक स्थिती पाहून पालकांनी आक्रोश व्यक्त केला. यावेळी शिक्षकांच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव दिसून आला.

"मुलांना घेऊन वाहन चालवित असताना पुलाआधी असलेल्या खड्यांमुळे वाहन उसळले. एका मुलाची बास्केट स्टेअरिंगला आदळली. मुले व बास्केट सांभाळण्याच्या प्रयत्नात वाहन पुलावरून खाली कोसळले."
- महेश पंजाब मेश्राम, व्हॅन चालक.

Web Title : भंडारा में खराब सड़क के कारण स्कूल वैन पुल से गिरी; 13 छात्र घायल।

Web Summary : भंडारा के पास खराब सड़क के कारण 13 छात्रों को ले जा रही एक स्कूल वैन पुल से गिर गई। एक छात्र गंभीर रूप से घायल, पांच को मामूली चोटें। गड्ढों के कारण ड्राइवर ने नियंत्रण खो दिया।

Web Title : School van crashes off bridge in Bhandara; 13 students injured.

Web Summary : A school van carrying 13 students crashed off a bridge near Bhandara due to poor road conditions. One student is seriously injured, and five others sustained minor injuries. The driver lost control after hitting potholes.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.