शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL 2026 Playoffs Race : स्क्रिप्ट भारी की, मॅच? १६ गुण कमावणाऱ्यांसाठीही पोटात गोळा आणणारा ट्विस्ट
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
7
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
8
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
9
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
11
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
12
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
13
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
14
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
15
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
16
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
17
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
18
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
19
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
20
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शाळा तिथे कायम मुख्याध्यापक हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, भंडारा तालुका व शहराचा संयुक्त शिक्षक मेळावा संत शिवराम महाराज माध्यमिक विद्यालय भंडारा येथे शनिवारी पार पडला. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानाहून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देसुधाकर अडबाले : भंडारा येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा शिक्षक मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासनाच्या धरसोडवृत्तीमुळे रोज नवे अध्यादेश काढुन संघटनांच्या विरोधानंतर आपलेच निर्णय रद्द करण्याची नामुष्की शासनावर आली आहे. संच निर्धारणाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील शिक्षक मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरले आहेत. १०० च्या खाली पटसंख्या असणाऱ्या शाळेतील मुख्याध्यापक यांनाही अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे. मात्र शाळा तिथे कायम मुख्याध्यापक हवा ही संघटनेची मागणी आहे, असे प्रतिपादन संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी केले.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, भंडारा तालुका व शहराचा संयुक्त शिक्षक मेळावा संत शिवराम महाराज माध्यमिक विद्यालय भंडारा येथे शनिवारी पार पडला. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानाहून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे, कार्याध्यक्ष चंद्रशेखर रांहागडाले, टेकचंद मारबते, के. आर. ठवरे, भाऊराव वंजारी, अनंत जायभाये, धीरज बांते, अर्चना भोयर, छाया वैद्य, कांता कामथे, माधुरी मस्के, समशाद सय्यद, जागेश्वर मेश्राम, दिनकर ढेंगे, मनोज अंबादे, शाम घावड, डी. ए. बारस्कर, मोरेश्वर वझाडे, अनिल कापटे, कुंदा बोधलकर, प्राथमिकचे जिल्हा कार्यवाह विलास खोब्रागडे, शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष सैनपाल वासनिक, सचिव गंगाधर भदाडे आदी उपस्थित होते.
सरकार्यवाह सुधाकर अडबाले म्हणाले, शिक्षकविरोधी निघणारे रोजचे शासन परिपत्रक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या चौकटीत बसत नसल्याने कोणतेही आदेश न्यायालयात टिकत नाही, त्यामुळे संघटनेच्या लढ्या पुढे आपलेच निर्णय शासनाला रद्द करावे लागते हे संघटनेचे यश आहे. प्राथमिक शिक्षकांना त्यांचे इच्छेविरुध्द शाळाबाह्य कामे न देण्याचे न्यायालयाचे आदेश असतांना कारवाईचा धाक दाखवून बळजबरीने शाळाबाह्य कामे दिली जातात. सभागृहात शिक्षकांच्या समस्यांना वाचा फोडणारे बळकट शिक्षक प्रतिनिधी नसल्याने रोज आदेश काढून शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले जातात. मराठी शाळा व शिक्षक टिकवून ठेवण्यासाठी व सभागृहात आपला आवाज बुलंद करण्यासाठी संघटनेशी प्रामाणिक रहावे, असे आवाहन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
मेळाव्याचे प्रास्ताविक शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांजेवार यांनी तर, संचालन शेखर बोरकर व आभार प्रदर्शन तालुका कोषाध्यक्ष अशोक बनकर यांनी मानले. शिक्षक मेळावासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ भंडारा तालुका व शहर पदाधिकारी यांनी सहकार्य घेतले.

टॅग्स :Socialसामाजिक