शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडीत होणार सावता माळी भाजी बाजार प्रकल्प

By admin | Updated: April 23, 2017 00:37 IST

शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित पिकांना योग्य दर मिळावा, व्यापाऱ्यांकडून लूट होऊ नये ...

राज्यातील पहिला उपक्रम : शीतगृहाचीही सुविधा भंडारा : शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित पिकांना योग्य दर मिळावा, व्यापाऱ्यांकडून लूट होऊ नये आणि शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाच्या सहकार व पणन मंत्रालयाने सावता माळी भाजी बाजार प्रकल्प सुरू करण्याची योजना अंमलात आणली आहे. या प्रकल्पातंर्गत भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे बाजार समितीच्या पाच एकर विस्तीर्ण जागेवर हा सुरू होणार असून हा प्रकल्प राज्यातील पहिला प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पासाठी मोहाडी व तुमसर तालुक्यातील २४६ गावांचा समावेश राहणार आहे. त्यासाठी या गावांची अद्ययावत माहिती गोळा करण्याच्या सूचना जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. हा प्रकल्प विकसीत करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत, त्यासाठी आमदार चरण वाघमारे आणि पणन विभागाचे सरव्यवस्थापक मिलींद आकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारला बैठक झाली. या बैठकीत बाजार समितीचे संचालक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा पणन अधिकारी, कृषी तज्ज्ञ व कृषी अधिकारी, कृषीभूषण व प्रगतशील शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी) १०० शेतकऱ्यांची कंपनी होणार भाजीपाला हे पीक नाशिवंत असल्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना उत्पादित केलेले पीक कमी दराने विकण्याची वेळ येऊ नये, यासाठी मोहाडी येथील शीतगृहात सहा महिन्यापर्यंत भाजीपाला मोफत ठेवता आला पाहिजे. पिकांना बाजारात योग्य दर आल्यानंतर पीक विकता यावे, यासाठी शीतगृह तयार करण्यात आले आहे. आपल्या भागातील शेतकऱ्यांचे पीक आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात करता यावी, यासाठी जिल्ह्यातील १०० शेतकऱ्यांची कंपनी नोंदणीकृत करण्यात येणार असल्याचे आमदार चरण वाघमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.