शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अभियान पाठ सोडेना

By admin | Updated: November 3, 2014 23:21 IST

महात्मा गांधी जयंतीपासून स्वच्छता अभियानाला सुरूवात झाली. सर्वच शाळा व महाविद्यालयांनी हे अभियान मोठा प्रमाणात राबविले. मात्र स्वच्छता अभियान पाठ सोडण्याची चिन्हे दिसत नसून

भंडारा : महात्मा गांधी जयंतीपासून स्वच्छता अभियानाला सुरूवात झाली. सर्वच शाळा व महाविद्यालयांनी हे अभियान मोठा प्रमाणात राबविले. मात्र स्वच्छता अभियान पाठ सोडण्याची चिन्हे दिसत नसून १४ नोव्हेंबर (बालक दिन) ते १९ नोव्हेंबर (जागतिक शौचालय दिन) या कालावधीत आणखी स्वच्छता अभियान राबविण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची फार मोठी तारंबळ उडाली आहे. स्वच्छतेचे महत्व कळावे, त्याचबरोबर रोगांना आळा घालता यावा, यासाठी केंद्र शासनाने २ आॅक्टोबरपासून स्वच्छता अभियान संपूर्णदेशात राबविण्यास सुरूवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: हातात झाडू घेऊन साफसफाई केली. त्याचबरोबर देशातल्या प्रत्येक शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था यांनी स्वच्छता मोहिम राबविण्याचे निर्देश दिले. त्याला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसादही मिळाला. मोहिमेचा दुसरा टप्पा राबविण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. हा टप्पा बालक दिनापासून सुरूवात होऊन जागतिक शौचालय दिनाला संपणार आहे. यामध्ये १४ नोव्हेंबर रोजी प्रभातफेरी काढणे, विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करणे, १५ नोव्हेंबर रोजी मुनादीद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करणे, १६ नोव्हेंबर रोजी वर्तमान पत्रामध्ये बातमी देणे, शाळेमध्ये जाऊन स्वच्छतेचा संदेश देणे, १७ नोव्हेंबर रोजी खुल्या जागेवर शौचास करण्यास बंदी आणणे, यासाठी नागरिक, स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य घेणे, १८ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक शौचालयांची साफसफाई करणे, साफसफाईचे वेळापत्रक तयार करून नागरिकांना साफसफाईचे व आरोग्यविषयक महत्व समजावून सांगणे, १९ नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिनानिमित्त प्रत्येक शाळेमध्ये कार्यक्रम आयोजित करून शौचालयाचे व आरोग्याचे महत्व समजावून सांगणे आदी कामे आहेत. (नगर प्रतिनिधी)