ठाणा पेट्रोल पंप येथे संक्रांत मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST2021-02-05T08:41:44+5:302021-02-05T08:41:44+5:30

जवाहरनगर : ठाणा पेट्रोल पंप येथे श्रीदत्त मंदिर सभागृहात संक्रांत मेळावा आयोजित करण्यात आला, कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपच्या महामंत्री ...

Sankrant Melava at Thane Petrol Pump | ठाणा पेट्रोल पंप येथे संक्रांत मेळावा

ठाणा पेट्रोल पंप येथे संक्रांत मेळावा

जवाहरनगर : ठाणा पेट्रोल पंप येथे श्रीदत्त मंदिर सभागृहात संक्रांत मेळावा आयोजित करण्यात आला, कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपच्या महामंत्री कल्याणी भूरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ‘लोकमत सखी मंच’च्या जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार या होत्या. अतिथींमध्ये परसोडीच्या सरपंच कल्पना मोटघरे, मनिषा रक्षिये, रितु पशीने, उज्ज्वला मेश्राम, डॉ.साधना वाघाडे, ॲड.वैदेही पटले, संगीता भुजाडे उपस्थित होते.

उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन व माता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रम सुरू करण्यात आले. कल्याणी भुरे यांनी म्हणाल्या, महिलांनी राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करावी व स्वत: सामाजिक कार्यात अग्रेसर राहावे, असे आवाहन केले. यानंतर, हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आले. सर्वांना वाण वाटप करण्यात आले. आयोजक डॉ.पौर्णिमा दिलीप फटीक यांची उपस्थिती होती. संचालन सपना हाडगे यांनी केले. कार्यक्रमासाठी चंदा पुन्नजवार, नीता चौरसिया, वैशाली धांडे, स्मिता उशेकवार, सुरेखा पुन्नजवार, ज्योती भुजाडे, श्यामली लेंडे, ललिता वाडीभस्मे, कल्पना कुर्जेकर, सोनू मेहेर, छाया कुंभलवार, वैशाली गनगने यांनी सहकार्य केले.

Web Title: Sankrant Melava at Thane Petrol Pump