शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

लिलावाआड रेतीचा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 06:00 IST

भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा आणि बावनथडी नदीच्या रेतीला मोठी मागणी आहे. रेती तस्करीला उधाण आले आहे. महसूल विभाग अनेकदा कारवाईचा सोपस्कार पार पाडते. रेती जप्तही करते. ही जप्त झालेली रेती नंतर लिलावातून विकली जाते. यातून शासनाला महसूल मिळावा हा उद्देश असतो. परंतु जप्तीतील रेती लिलावात घेतल्यानंतरही त्या नावावरही गोरखधंदा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देतीन वर्षातील जप्तीची कारवाई : घरकुल बांधकामाच्या नावावर रेती वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महसूल विभागाने विविध कारवाईत जप्त केलेल्या रेतीची लिलाव प्रक्रिया राबवून त्याआड रेतीचा गोरखधंदा सुरु आहे. अर्थपूर्ण व्यवहारातून रेती तस्करांसाठी हा प्रकार सोयीचा असून लिलावातील रेतीसोबतच नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी केली जाते. गत तीन वर्षांपासून जिल्ह्यातील विविध घाटांवर हा धक्कादायक प्रकार सुरु आहे.भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा आणि बावनथडी नदीच्या रेतीला मोठी मागणी आहे. रेती तस्करीला उधाण आले आहे. महसूल विभाग अनेकदा कारवाईचा सोपस्कार पार पाडते. रेती जप्तही करते. ही जप्त झालेली रेती नंतर लिलावातून विकली जाते. यातून शासनाला महसूल मिळावा हा उद्देश असतो. परंतु जप्तीतील रेती लिलावात घेतल्यानंतरही त्या नावावरही गोरखधंदा करण्यात येत आहे. महसूल विभागाने जप्तीतील लिलाव केलेल्या रेतीसाठ्याच्या दहापट रेती तस्कर त्या परवान्यावर नेत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे जप्त केलेला रेतीसाठा हा नदीपात्राचा आसपास ठेवलेला असतो. तो साठा लिलाव घेणारे आपल्या सोईने घेवून जातात. परंतु हा जप्तीतील रेतीसाठा तस्करांसाठी कुरण ठरू पाहत आहे. याला महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचे बोलले जाते.तुमसर तालुक्यात रेतीचा अवैध उपसा राजरोसपणे सुरु आहे. येथे ट्रॅक्टर व ट्रक ची संख्याही मोठी आहे. प्रत्येक ट्रक व ट्रॅक्टरमागे हिस्सा देण्यात येतो. २ ते ५ हजार रुपये अशी किंमत ठरली आहे. गावस्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंतच्या अधिकाऱ्यांचे हात ओले केले जातात. त्यामुळे येथे कारवाई होत नाही.तुमसर तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व ठिकाणी रेतीतस्करीचा गोरखधंदा सुरु आहे. याबाबत अधिकारी मौन बाळगून असून पोलीस कारवाईही करताना दिसत नाही. तुमसर तालुक्यात तर सध्या रेती तस्करीला उधाण आले आहे. एलसीबीच्या अधिकाºयांची खांदेपालट झाल्यानंतरही कुठेच कारवाई दिसत नाही.घरकुल रेतीचा परवानाघरकूल बांधकामाच्या नावावर महसूल विभागाने एक ते दीड बास रेतीचा परवाना घरकुल मालकांना दिला आहे. परंतु या घरकूल परवान्यावरही आता रेतीची तस्करी केली जात आहे. असा प्रकार मोहाडी तालुक्यात उघडकीस आला. एकीकडे लाभार्थ्यांना घरकूलासाठी रेती मिळत नाही. परंतु दुसरीकडे त्याच परवान्यावर रेतीची वाहतूक होत आहे.बिंग फुटणारतुमसर तालुक्यातील रेती लुटीची गंभीर दखल पर्यावरण मंत्रालयाने घेतली आहे. लोकमतमध्ये प्रकाशित वृत्तांचे कात्रण राज्याच्या पर्यावरण मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. गत पाच वर्षातील रेती तस्करीचा आढावा घेतला जाणार असून संबंधित मंत्रालयाने याबाबत माहिती मागविली आहे. गोपनीय पध्दतीनेही बावनथडी आणि वैनगंगा नदीची पाहणी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :sandवाळू