शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशातील आयात धानाची तुमसर तालुक्यात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 05:00 IST

मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन होते. हलक्‍या प्रतीच्या  धानाला तेथे कमी किंमत आहे. त्यामुळे सदर धान तुमसर तालुक्यातील शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर विक्री केला जात आहे. शेतकऱ्याकडून सातबारा जमा करून हा धान नियमात बसवून विक्री करणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. मध्यप्रदेशातून तुमसर तालुक्यात येत असणारा धान हा ट्रकने आणला जातो. एका विशिष्ट ठिकाणी हा धान गोळा केला जातो.

ठळक मुद्देस्थानिक शेतकऱ्यांच्या सातबारावर विक्री

  मोहन भोयर 
     लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील काही शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर मध्यप्रदेशातील धान विक्री केल्या जात असल्याची खळबळजनक माहिती आहे.   स्थानिक शेतकऱ्यांच्या सातबारावर ही विक्री होत असून  तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान गत आठ दिवसापासून खरेदी केंद्रावर पडून आहे. 
तुमसर तालुका धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. शासनाने यावर्षी तुमसर तालुक्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले. शेतकऱ्यांना बोनस देण्याचीही घोषणाही केली. तुमसर तालुका मध्य प्रदेशाच्या सीमेचर आहे. मध्यप्रदेशातील सीमावर्ती भागातील धान मोठ्या प्रमाणात तुमसर तालुक्यात येणे सुरू झाले आहे. येथील येथील शेतकऱ्यांच्या सातबारावर हा धान शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केला जात आहे. मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन होते. हलक्‍या प्रतीच्या  धानाला तेथे कमी किंमत आहे. त्यामुळे सदर धान तुमसर तालुक्यातील शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर विक्री केला जात आहे. शेतकऱ्याकडून सातबारा जमा करून हा धान नियमात बसवून विक्री करणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. मध्यप्रदेशातून तुमसर तालुक्यात येत असणारा धान हा ट्रकने आणला जातो. एका विशिष्ट ठिकाणी हा धान गोळा केला जातो. तेथून बारदान्यात भरून ट्रॅक्टरने संबंधित शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर तो नेण्यात येतो. त्यांच्याजवळ सदर धानाचा सातबारा असते त्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्र संचालक त्यांचे धान सहज घेतात. मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागातील धान व तुमसर तालुक्यातील धान यांच्यात कमालीचे अंतर आहे. त्यामुळे मध्यप्रदेशतील धान कोणते आहे हे सहज ओळखता येते. परंतु या धानाची ओळख करण्यास कुणालाच वेळ नाही. मध्यप्रदेशात सर्वसाधारण धानाला भाव कमी असल्याने अनेक व्यापारी तेथुन धान खरेदी करुन भंडारा जिल्ह्यातील सीमावर्ती आधारभुत केंद्रावर विकत असल्याची माहिती आहे. याची चौकशी करणे गरजेचे आहे.

सातबारा जमा करणारी टोळी सक्रिय
तुमसर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपले धान व्यापाऱ्यांना विक्री केले आहे. त्यामुळे त्यांच्या शेतीचा सातबारा त्यांच्याकडे आहे. हा सातबारा जमा करण्यात येतो. त्या मोबदल्यात त्यांना काही रक्कम देण्यात येतो. त्यामुळे सदर लहान शेतकरी आपला सातबारा या टोळीला देतात अशी माहिती आहे. सदर प्रकरणात पणन कार्यालय अनभिज्ञ असल्याचे समजते. मागील अनेक महिन्यापासून येथे असाच प्रकार सुरू आहे. परंतु अजूनपर्यंत कुठेही चौकशी आणि कारवाई झाल्याचे ऐकीवात नाही.
 

त्या शेतकऱ्यांनी विकले व्यापाऱ्यांना धान
मध्यप्रदेशातील धान विक्री करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा सातबारा घेण्यात आला. संबंधित शेतकऱ्यांनी आपले धान यापूर्वीच व्यापाऱ्यांना विक्री केले आहे. त्यामुळे त्यांच्या सातबारावर नियमात बसवून मध्यप्रदेशातील धान येथे सहज विक्री केला जात आहे. धान विक्री करण्याचे येथे रॅकेट सक्रीय असल्याची माहिती आहे.
 

मध्यप्रदेशातील धान तुमसर तालुक्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केली जात नाही. यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे.
- गणेश खर्चे, 
जिल्हा पणन अधिकारी भंडारा.
तुमसर तालुक्यातील सीमावर्ती भागात मध्यप्रदेशातील धान मोठ्या प्रमाणात येत असून त्यांची येथील सातबारावर शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केली जात आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार आहे. संबंधित विभागाने सखोल चौकशी करून कारवाई करावी. 
- शंकर राऊत,  
अध्यक्ष, तुमसर तालुका काँग्रेस कमिटी.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड