विजेच्या समस्येने साहुलीवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 05:00 AM2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:00:40+5:30

वीज वितरण कंपनीला अनेकदा तक्रारी करूनही कंपनी तक्रारी सोडविण्यास पुढाकर घेत नाही. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकारा विरोधात साहुली ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव घेऊन वीज वितरणाशी संबंधित विविध समस्या सोडविण्याचे निवेदन सावरी (जवाहरनगर) येथील सहाय्यक अभियंता यांना दिले.

The Sahulians suffer from electricity problems | विजेच्या समस्येने साहुलीवासी त्रस्त

विजेच्या समस्येने साहुलीवासी त्रस्त

Next
ठळक मुद्देवीज वितरणाचे दुर्लक्ष : रोहित्र निकामी, तीन महिन्यांपासून ब्रेकडाऊन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा तालुक्यातील साहुली - राजोला गावठाण फिडर गत तीन महिन्यांपासून ब्रेकडाऊन होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांसह शेतकरी त्रस्त झाले आहेत. वीज वितरण कंपनीला अनेकदा तक्रारी करूनही कंपनी तक्रारी सोडविण्यास पुढाकर घेत नाही. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकारा विरोधात साहुली ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव घेऊन वीज वितरणाशी संबंधित विविध समस्या सोडविण्याचे निवेदन सावरी (जवाहरनगर) येथील सहाय्यक अभियंता यांना दिले.
जवाहरनगर नजिकच्या साहुली येथील रोहित्र गत तीन महिन्यांपासून नादुरुस्त आहे. विद्युत विभागाला अनेकवेळा तक्रार देऊनही कर्मचारी तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहेत. सहाय्यक अभियंता यांच्या कार्यालयात तक्रार घेऊन गेले असता सहाय्यक अभियंता आठ दिवसात रोहित्र बदलवून मिळणार असल्याचे आश्वासन देतात. मात्र तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्यापही रोहित्र लावण्यात आलेले नाही. त्यामुळे शेती पिके सिंचनाअभावी धोक्यात आली आहेत. साहुली येथील रोहित्रावर परिसरातील ३२ मोटारपंपधारकांचे कनेक्शन असून या रोहित्रावर दाब वाढत आहे. परिणामी दिवसातून अनेकवेळा फेज उडत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतसिंचनाकरिता मोठी अडचण निर्माण होते. अनेकवेळा शेतकºयांनी दोन रोहित्राची मागणी केली असताना अभियंता यांनी शेतकºयांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.
रोहित्र नादुरुस्त रोहित्र कार्यालर्यालयात आणून शेतकºयांनी स्वत:च्या वाहनातून नवीन रोहित्र घेऊन जावे, असा दिशाभूल करणारा सल्ला शेतकºयांना संबधित अभियंता देत आहे. साहुली परिसरातील रोहित्र वर्षातून तीन चार वेळा नादुरुस्त होत असतो. त्यामुळे शेतकºयांना मोठा त्रास सहन करावा लागतो. साहुली, राजोला गावठाण फिडरमध्ये १६ गावांचा समावेश असून पावसाळ्याच्या दिवसात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या किंवा हवेची झुळूक आली तरी वीज पुरवठा खंडीत होत असतो.
रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडीत झाला तर संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागते. विद्युत विभागाला अनेकवेळा तक्रारी देऊनही विद्युत विभाग तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहे. पावसाळ्यापूर्वी तारांवर येणाऱ्या झाडांच्या फांद्या कापणे गरजेचे असताना दुर्लक्ष करण्यात आले. परिसरातील बरेच विजेचे खांब पडण्याच्या अवस्थेत असून जीवंत विद्युत तारा जमिनीपर्यंत लोंबकळत आहेत. जीवंत विद्युत तारांमुळे जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेतरस्त्यावरून शेतकऱ्याना शेतपिक किंवा इतर साहित्य ने आण करताना जीवावर बेतून ने आण करावी लागते. परिसरातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत साहुली येथील ग्रामसभेत ठराव घेऊन साहुली, राजोला गावठाण फिडर दुरुस्त करण्यात यावे, एजी लाईन २४ तास देणे, एजी लाईनवरील वाळलेले पोल सरळ करणे, एजी लाईवरील रोहित्र बदलवून देणे, लोंबकळत असलेल्या जीवंत विद्युत तारा उंच करून देणे, गावठाण फिडरचे झुकलेले विद्युत खांब सरळ करणे, सिंग फेस लाईन सतत चालू ठेवण्यात यावी, असे ठराव ग्रामसभेत घेऊन सहाय्यक अभियंतांना निवेदन देण्यात आले. आतातरी वीज वितरण विभाग समस्या सोडवेल, अशी अपेक्षा गावकºयांनी व्यक्त केली आहे.

लोंबकळणाऱ्या तारांमुळे अपघाताची शक्यता
शेतातील विद्युत खांबाचे तार लोंबकळत असल्यामुळे शेतीकाम करतेवेळी अपघात होऊन जीवीतहानी होण्याची शक्यता असल्यामुळे साहुली येथील शेतकरी दत्तू मने याने विद्युत तारांखालील शेतजमीन पडीक ठेवली असल्याचे परिसरात बोलले जाते. तसेच भूमेश्वर सेलोकर व चिंतामण सेलोकर यांच्या शेतात जाणाऱ्या शेतरस्त्यावरील विद्युत खांबाचे तार जमिनीपर्यंत लोंबकळत असल्यामुळे जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरातील लोंबकळणाºया विद्युत तारा उंचावून वाकलेले विद्युत खांब सरळ करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

Web Title: The Sahulians suffer from electricity problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज