शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रोहिणी कोरडा, पेरणीसाठी मृगाच्या पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST

कडक उन्हातही शेतकऱ्यांनी खरीप हंगमाची तयारी चालविली आहे. पीक कर्जासाठी धडपड, जनावरांच्या वाळलेल्या चाऱ्यांची व्यवस्था, कौलारु घराच्या छावण्या, शेतातील तणकट काढणे, काट्या जाळणे, शेती तयार करणे आदी कामे धडाक्यात सुरु आहेत. परंतू पावसाअभावी शेतकऱ्यांचे गणित बिघडत चालले आहे. मृगातही कडक उन्हाच्या झळा बळीराजाला असह्य करीत आहेत.

ठळक मुद्देउन्हाच्या दाहकतेने त्रस्त : कर्जासाठी बँक व सोसायट्याच्या चकरा

युवराज गोमासे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : रोहिणी नक्षत्र कोरडा जावून मृग नक्षत्राला सुरुवात झालेली असताना प्रचंड तापमानाने सर्वच हैराण झाले आहेत. कडक उन्हातही शेतकऱ्यांनी खरीप हंगमाची तयारी चालविली आहे. पीक कर्जासाठी धडपड, जनावरांच्या वाळलेल्या चाऱ्यांची व्यवस्था, कौलारु घराच्या छावण्या, शेतातील तणकट काढणे, काट्या जाळणे, शेती तयार करणे आदी कामे धडाक्यात सुरु आहेत. परंतू पावसाअभावी शेतकऱ्यांचे गणित बिघडत चालले आहे. मृगातही कडक उन्हाच्या झळा बळीराजाला असह्य करीत आहेत.
सात जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली. मृग नक्षत्राच्या सुरुवातीला दोनदा चांगला पाऊस पडला. हवेचे झोके वाढले आहेत. मात्र, त्यानंतर तुरळक सरी कोसळल्याने उकाडा आणखी असह्य झाला आहे. हलक्या सरी वातावरणात गारवा निर्माण करण्यास अपयशी ठरल्या आहेत. गत चार वर्षांपासून मृग नक्षत्र शेतकऱ्यांशी दगाबाजी करीत आहे. उन्हाळ्यापेक्षाही जास्त ऊन तापत आहे. मृगाचा पाऊस चांगला झाल्यास पेरणीच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बि-बियाण्याची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहे.
पैशाची अडचण असल्याने पीक कर्जासाठी बँक व सोसायट्याच्या शेतकºयांनी चकरा वाढविल्या आहेत. करडी परिसरात मागील वर्षांप्रमाणे यावर्षीसुध्दा राष्ट्रीयकृत बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात माघारल्या आहेत. अनेक राष्ट्रीयकृत बँका तर शेतकऱ्यांच्या नावाने बोटा मोडीत आहेत.
बेभरवश्याचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी अजुनही बियाणे व खतांची खरेदी केलेली नाही. शेतकऱ्यांना दमदार पावसची प्रतीक्षा आहे. मागील चार वर्षात शेतकऱ्यांना धानाची दुबार पेरणी करावी लागल्याचा अनुभव पाठीशी असल्याचे फुकून पावले टाकत आहेत.
खते व बियाण्यांच्या किंमती वाढल्याने आर्थिक भुर्दंड यावर्षी बसणार असल्याने कोणत्या कंपनीचे बियाणे घेणे फायदेशीर राहील, याची चाचपणी सुरु आहे. त्यासाठी इतर शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षांत लागवड केलेले वाण फायदेशिर ठरले का, याची माहिती घेतली जात असल्याचे दिसून येते.

ट्रॅक्टरच्या मशागतीचे दर वाढणार
सध्या शेती आधुनिक पध्दतीने ट्रॅक्टर व यंत्राचे सहाय्याने करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्याचबरोबर बैलजोडी पोसणे लहान शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याने पेरणी, नागरणी पासून तर चिखलणीपर्यंतची कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने होत आहेत. परंतू मागील वर्षी पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने यावर्षी मशागतीच्या दरात वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

कृषी सहायक शेतकऱ्यांप्रती उदासीन
करडी परिसरात खरीपाचा हंगाम सुरु झालेला असतांना कृषी सहायक व मंडळ कृषी अधिकारी आपल्या गटात फिरताना दिसत नाही. त्यांच्या काामावर येण्याच्या वेळा निर्धारित नाहीत. केव्हाही येणे, तालुक्याच्या कार्यालयाचे नाव सांगुन घरीच राहणे सुरु आहे. हंगामात शेतकºयांनी कोणत्या बियाण्यांची खरेदी करावी, खरेदी करतांना कोणती काळजी घेतली जावी, यांचे मार्गदर्शन शेतकºयांनी मिळत नाही. कृषी सहाय्यकांची उदासिनता आता चिंतेची बाब ठरु पाहत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी