शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
3
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
4
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
5
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
6
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
7
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
8
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
9
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
10
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
11
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
12
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
13
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
14
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
15
मराठा समाजासाठी आमच्या एवढे काम कोणी केले नाही काेणतीही याेजना बंद नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
16
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
17
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
18
भारत-नेदरलँड्स यांच्यात १७ करारांवर स्वाक्षऱ्या; पंतप्रधान मोदी-रॉब जेटेन यांच्यात धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी केंद्रात शेतकऱ्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 06:00 IST

येथील आधारभूत धान खरेदी केंद्रात परिसरातील दहा ते बारा गावांचा समावेश आहे परंतू केंद्रात समाविष्ट असलेल्या गावातील शेतकऱ्यांना डावलून बाहेरच्या शेतकºयांची धान खरेदी केली जात आहे. कित्येक दिवसांपासून धान उघड्यावरच ठेवले असल्याने धान्याची नासाडी होत आहे. शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या धानाची वेळवर नियमीत वजनमाप केले जात नाही.

ठळक मुद्देकाटेब्राह्मणीतील प्रकार : खरेदी संस्थेची चौकशी करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
आंधळगाव : शेतमालाला योग्य भाव मिळावा व शेतकऱ्यांची लूट थांबावी यासाठी शासनाकडून जिल्हयात ६७ आधारभूत धान खरेदी केंद्र उघडण्यात आले. मात्र तालूक्यातील काटेबाम्हणी येथील शासकीय धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेल्या धानाच्या प्रत्येकी पोत्यामागे पाच कीलोची धानाची लूट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
येथील आधारभूत धान खरेदी केंद्रात परिसरातील दहा ते बारा गावांचा समावेश आहे परंतू केंद्रात समाविष्ट असलेल्या गावातील शेतकऱ्यांना डावलून बाहेरच्या शेतकºयांची धान खरेदी केली जात आहे. कित्येक दिवसांपासून धान उघड्यावरच ठेवले असल्याने धान्याची नासाडी होत आहे. शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या धानाची वेळवर नियमीत वजनमाप केले जात नाही. उलट शेतकऱ्यांकडून वजनमाप करून देण्यासाठी संबधित केंद्र चालकांकडुन पैशाची मागणी केली जाते, असे शेतकºयांचे म्हणने आहे. यात मात्र धान खरेदी केंद्र चालकांच्या नातेवाईकांचे व संबंधितांच्या धानाचे वजनमाप लवकर व नियमीत केले जात असल्याचे खुद्द शेतकरी सांगतात.
सध्या ढगाळ वातावरण असून धान खरेदी केंद्रांवर शेकडो शेतकऱ्यांचे हजारो धानाचे पोते उघड्यावर ठेवले आहेत तर पावसाच्या बचावासाठी संबधित केंद्र चालकांने धान खरेदी केंद्रांवर कुठलीही व्यवस्था केलेली नाही. बारदाना सूध्दा परत मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. संबधित केंद्र चालकासोबत मार्केटिंग फेडरेशन व बाजार समीतीच्या कर्मचाºयांचे संगनमत असल्याचे बोलले जात आहे. मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यानी काटेबाम्हणीतील आधारभूत धान खरेदी संस्थेवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

नियम व अटींना बगल
आधारभुत केंद्राच्या शासकीय नियम व अटींना बगल देत, केंद्रात समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांना वगळून बाहेरच्या शेतकऱ्यांचे परस्पर धानाची विविध ठिकाणच्या राईस मिलमध्ये विल्हेवाट लावून सर्रासपणे धान खरेदी केली जात असल्याचे सूध्दा समोर आले आहे. केंद्रातील गावाच्या व्यतिरीक्त जे शेतकरी धान खरेदी केंद्रांवर धान विक्रिस आणत नाही अशाही शेतकऱ्यांच्या नावे संबधित तलाठी कार्यालयामार्फत सातबारा घेऊन त्या शेतकºयांच्या नावावर पैशाची उचल होणार असल्याचीही माहिती आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड