पटेल महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST2021-02-05T08:41:31+5:302021-02-05T08:41:31+5:30

फोट भंडारा: येथील जे. एम. पटेल महाविद्यालय आणि जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, भंडारा यांचा संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान ...

Road safety campaign at Patel College | पटेल महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान

पटेल महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान

फोट

भंडारा: येथील जे. एम. पटेल महाविद्यालय आणि जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, भंडारा यांचा संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत दिनांक १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०२१ दरम्यान पथनाट्य, निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, वादविवाद स्पर्धांचे आयोजन केले आहे.

रस्ता सुरक्षा कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी वाहन चालविताना तरुणांनी साहसी खेळ दाखविणे टाळावे असे तरुणांना सूचित केले. पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी रस्ता सुरक्षा अभियानाचे महत्त्व विशद करून नागरिकांनी वाहन चालविताना कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी वाहतुकीच्या नियमांविषयी महत्त्वाची माहिती उपस्थितांना सांगितली. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर सहारे यांनी पथनाट्य सदरीकरणाच्या माध्यमातून रस्ते वाहतुकीसंबंधी जाणीव जागृती करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी रस्ता सुरक्षितता अभियान अंतर्गत मोटार वाहनचालकांनी कोणती काळजी घ्यावी याचे पथनाट्याचे माध्यमातून सादरीकरण केले. जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा भंडारातर्फे उपस्थितांना रस्ता सुरक्षा जनजागृती रथाच्या सहाय्याने जनजागृती केली व ‘सडक सुरक्षा जीवन सुरक्षा’चे मोटारवाहन विषयक सूचना पत्रकांचे वाटप करण्यात आले. संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. भोजराज श्रीरामे यांनी केले. कार्यक्रमाला अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्षाचे समन्वयक डॉ. कार्तिक पनिकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रशांत वालदेव, डॉ. वीणा महाजन, एन. सी. सी. चे प्रमुख प्रा. जितेंद्र किरसान, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखाचे कर्मचारी, सर्व विभागाचे विभागप्रमुख व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी तथा विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Road safety campaign at Patel College