नियमबाह्यपणे नदीपात्रात तयार केला रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 05:00 AM2020-08-05T05:00:00+5:302020-08-05T05:00:26+5:30

बावनथडी नदी काठावर असणाऱ्या घानोड व सक्करधरा गावाचे शिवारात मध्यप्रदेशातील रेती माफियांनी रेतीचा डंपींग यार्ड गेल्या दोन वर्षापूर्वी तयार केला आहे. परंतु या डंपींग यार्ड मधील रेती विक्रीची मुदतवाढ संपल्यानंतर माफियांनी याकडे पाठ दाखविली आहे. त्यांना रेती घाट लिलावाची प्रतीक्षा होती. परंतु घाटाचे लिलाव झाले नाही. यामुळे रेती विक्रीकरिता माफिया कासावीस आहे.

Road illegally built in the river basin | नियमबाह्यपणे नदीपात्रात तयार केला रस्ता

नियमबाह्यपणे नदीपात्रात तयार केला रस्ता

Next
ठळक मुद्देमध्य प्रदेशतील रेती माफियांचा हैदोस : गावकऱ्यांमध्ये संताप, रेतीचा उपसा सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : घानोड व सक्करधरा गावाच्या शिवारात असणाºया बावनथडी नदीच्या पात्रात मध्यप्रदेशातील रेती माफियांनी अनधिकृत डंपींग यार्ड मध्ये रेतीचा उपसा सुरु केला आहे. यासाठी नियमबाह्यपणे नदीपात्रात रस्ता तयार करण्यात आला आहे. महसूल आणि पोलीस विभागाचे कारवाईला लाजवेल असा प्रकार सुरु असल्याचे गावकऱ्यांत संताप निर्माण झाला आहे.
बावनथडी नदी काठावर असणाऱ्या घानोड व सक्करधरा गावाचे शिवारात मध्यप्रदेशातील रेती माफियांनी रेतीचा डंपींग यार्ड गेल्या दोन वर्षापूर्वी तयार केला आहे. परंतु या डंपींग यार्ड मधील रेती विक्रीची मुदतवाढ संपल्यानंतर माफियांनी याकडे पाठ दाखविली आहे. त्यांना रेती घाट लिलावाची प्रतीक्षा होती. परंतु घाटाचे लिलाव झाले नाही. यामुळे रेती विक्रीकरिता माफिया कासावीस आहे. त्यांनी पांढऱ्या सोन्यातून कोट्यवधीची कमाईकरिता नवीन संधी शेधण्याचा प्रयत्न केला आहे.
डंपींग यार्डमध्ये १ हजार ब्रास वरेती उपलब्ध करताना २ हजार ब्रासची रॉयल्टी शासनाकडून उपलब्ध करून घेतली आहे. डंपींग मध्ये रॉयल्टी नुसार रेती उपलब्ध नसताना या माफियांनी नवीन शक्कल लढविली आहे. डंपींग मध्ये असणारी रेती विक्रीची मंजुरी असताना त्यांनी महसूल आणि पोलीस यांचे सोबत साटेलोटे करीत नदी पात्रातून रेतीचा उपसा डंपींग यार्ड मध्ये करण्यास सुरुवात केलीअ ाहे. नदीपात्रात नियमबाह्य रस्ता रेती माफियांनी तयार केला आहे. राजरोसपणे सुरु असणाºया या रेती चोरीची माहिती महसूल आणि पोलीस विभागाला असली तरी माफियांसमोर यंत्रणा नतमस्तक असल्याचे दिसून येत आहे. गावाचे शेजारी अनधिकृत डंपींग यार्ड तयार करण्यास आले असता माफियांचे विरोधात गावकरी एकवटले आहेत.
नियमबाह्य रस्ता नदी पात्रात तयार करण्यात आला आहे. याच डंपींग यार्डमध्ये रेती साठवणूक करण्यात येत आहे. यामुळे रॉयल्टी अंतर्गत रेतीची विक्री होत असताना डंपींग यार्ड मधील रेती साठा कमी होत नाही. या उलट रेतीची स्थिती जैसे थे आहे. गेल्या आठवड्यापासून हा प्रकार सुरु असताना महसूल व पोलीस विभागाने तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली आहे. या डंपींग यार्डमधील रेती विक्रीकरिता रॉयल्टी उपलब्ध करताना नियंत्रणाकरिता महसूल आणि पोलीस यात नेमले नाही. माफिळांना रान मोकळे करण्यात आले आहे. मध्यप्रदेशातील या रेतीच्या माफियांची दहशत नदी काठावरील सीमावर्ती गावात असल्याने यंत्रणेतील कर्मचारी जात नाही. नदीपात्रात तयार अनधिकृत रस्ता, यंत्रणेचा माफियांना अभय यामुळे गावकरी संतापले आहेत.

सोंड्या गावाचे शिवारात ढिग
पावसाने दडी मारले असल्याने बावनथडी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. गावात असणारे रेती चोरटे सक्रीय झाली आहे. सोंड्या आणि महालगाव येथे खासगी जागेत रेतीचे डंपींग यार्ड तयार करण्यात आली आहे. खासगी जागा मालकावर फौजदारी कारवाई होत नसल्याचे मनोबल वाढत आहेत. आधी रेती चोरी करणारे चोरटे नंतर माफियांचा रुप घेत आहेत. आज मंगळवार हा दिवस भर रेती माफियांनी नद्यांचे काठावरील गावात हैदोस घातला आहे. परंतु कुणी कारवाई करिता गेले नाहीत.

Web Title: Road illegally built in the river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.