शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

दुभाजकामुळे रस्ता झाला अरुंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 06:00 IST

बस स्टॉप चौक मोहाडी येथे रस्ता दुभाजकाचे काम एक महिन्यापासून सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी भविष्याच्या विचार न करता तसेच मोठे जड वाहने अरुंद झालेल्या रस्त्यावरून कसे वळण घेतील याचा परिपूर्ण अभ्यास न करता दुभाजक बांधण्याचे कार्य सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देमोहाडी शहरातील प्रकार : अपघाताची शक्यता बळावली

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : येथील राज्य महामार्गावरील मोहाडी बस स्टॉप चौकात दुभाजकाचे काम मागील एक महिन्यापासून संथ गतीने सुरू असल्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या दुभाजकामुळे चौकातील रस्ता अरुंद झाल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली असून हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.बस स्टॉप चौक मोहाडी येथे रस्ता दुभाजकाचे काम एक महिन्यापासून सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी भविष्याच्या विचार न करता तसेच मोठे जड वाहने अरुंद झालेल्या रस्त्यावरून कसे वळण घेतील याचा परिपूर्ण अभ्यास न करता दुभाजक बांधण्याचे कार्य सुरू करण्यात आले.एवढेच नाही तर अंदाज पत्रकाप्रमाणे काम सुद्धा करण्यात येत नसल्याचे काही जाणकारांचे म्हणणे आहे. बांधकामासाठी वापरण्यात येणारी रेती ही माती मिश्रित असल्याची तसेच बांधकाम पक्के होण्यासाठी सिमेंटच्या बांधकामावर पाणी मारण्यात येत नसल्याची तक्रार आहे.रस्ता दुभाजकाचे कार्य सुरू असतानाच अरुंद झालेल्या रस्त्यामुळे एका चार चाकी वाहनाने या दुभाजकाला धडक दिली त्यामुळे एका बाजूचे दुभाजकही थोडेसे तुटलेले आहे.जर दुभाजक तयार करायचे होते तर त्यासाठी रस्ता रुंद करणे गरजेचे होते. असे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे होत असलेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी व होत असलेल्या कामात आत्ताच सुधारणा करावी, जेणेकरून भविष्यात अपघात होणार नाही, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा