शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
3
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
4
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
5
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
6
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
7
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
8
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
9
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
10
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
11
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
12
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
13
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
14
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
15
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
16
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
17
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
18
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
19
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
20
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

लाखनी येथे पोलीस विभागातर्फे रेझिंग डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 06:00 IST

पोलीस बँड पथकाद्वारे विद्यार्थ्यांसमोर राष्ट्रभक्ती जागृत करणारी विविध देशभक्तिपर गीते याप्रसंगी पोलीसांनी सादर केली. यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षकांनी रस्ता सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना माहिती व प्रात्यक्षिक दाखवून सर्वांनी वाहतूक नियम पाळण्यासाठी शपथ देण्यात आली. संचालन रोहन पाल यांनी तर आभार उमेश शिवणकर यांनी मानले.

ठळक मुद्देसंडे अँकर । देशभक्तीपर गीतातून जागविल्या आठवणी , विद्यार्थ्यांना मोबाईलचा दुरुपयोग टाळण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : लाखनी पोलीस स्टेशन आणि समर्थ विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने लाखनी पोलीस ठाण्यात पोलीस स्थापना दिवस सप्ताहानिमित्त रेझिंग डे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून विजय हेमणे, नरेंद्र मुरकुटे, पोलीस नायक उमेश शिवणकर, अजिंक्य भांडारकर, भारती गुरूनानी उपस्थित होते. रेझिंग डेच्या निमित्ताने गुन्हे विभाग, महिला संरक्षण विभाग, गोपनीय कामकाज, गुन्हे शाखा माहिती, शस्त्र विभाग महिला व पुरुष बंदी गृह, गोपनीय विभाग आणि पोलीस विभागातून होणाऱ्या अनेक कामकाजासंदर्भात पोलीस निरीक्षक मंडलवार यांनी विद्यार्थ्यांना पुरेपूर प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना विजय राऊत यांनी दारुगोळा बंदुका आणि त्यांचा प्रशासनामध्ये कसा उपयोग केला जातो याच्या संदर्भात प्रत्यक्ष बंदुका दाखवून विद्यार्थ्यांना पोलीसांचे कामकाज समजावून सांगितले. पोलीस सहाय्यक विजय हेमने यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिवापराने होणारे दुरुपयोग आणि त्यातून होणारे नकळत गुन्हे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराव्दारे संवाद साधला. रेझिंग डे निमित्ताने पोलीस आणि विद्यार्थ्यांमधील संवाद अधिक दृढ झाला.
पोलीस बँड पथकाद्वारे विद्यार्थ्यांसमोर राष्ट्रभक्ती जागृत करणारी विविध देशभक्तिपर गीते याप्रसंगी पोलीसांनी सादर केली. यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षकांनी रस्ता सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना माहिती व प्रात्यक्षिक दाखवून सर्वांनी वाहतूक नियम पाळण्यासाठी शपथ देण्यात आली. संचालन रोहन पाल यांनी तर आभार उमेश शिवणकर यांनी मानले.

विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीचे धडे
रेझिंग डे कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना बालवयात देशाबद्दल असलेला अभिमान तसेच बालवयापासून विविध कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी कर्तव्य निभावण्याचे तसेच विविध राष्ट्रभक्तीपर गीतातून राष्ट्रभक्तीचे धडे देण्यात आले. यावेळी शहीद झालेल्या जवानांचे दाखले देत भविष्यात विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रातून देशासाठी नाव कमाविण्याचे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमातून केले.

टॅग्स :Policeपोलिस