शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

एक लक्ष मतदार बजावणार मतदानाचा हक्क

By admin | Updated: September 25, 2014 23:18 IST

विधानसभा निवडणुकात लाखनी तालुक्यातील १ लक्ष ३३८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात ५१ हजार ७२ पुरुष मतदार व ४९ हजार ७६६ स्त्री मतदार मतदान करणार आहेत. साकोली विधानसभा

चंदन मोटघरे - लाखनीविधानसभा निवडणुकात लाखनी तालुक्यातील १ लक्ष ३३८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात ५१ हजार ७२ पुरुष मतदार व ४९ हजार ७६६ स्त्री मतदार मतदान करणार आहेत. साकोली विधानसभा क्षेत्रातील राजकीय समीकरण तयार करण्यात लाखनी तालुक्याची भूमिका महत्वाची आहे. तालुक्यात तीन व्यक्तींना साकोली क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. काँग्रेस, भाजपा व शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची तालुक्यात मजबूत संघटन बांधणी आहे. लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील मतदारांचा कल भाजपाकडे होता.लाखनी तालुका साकोली विधानसभा क्षेत्रात येतो. साकोली विधानसभा क्षेत्राचे दोनदा प्रतिनिधीत्व करण्याची संधी तालुक्यातील केसलवाडा (वाघ) येथील सेवक वाघाये यांना १९९, २००४ च्या निवडणुकीत प्राप्त झाली. मुरमाडी (सावरी) येथील भाजपाच् या तिकीटावर उभे राहिलेले शिवराम गिऱ्हेपुंजे यांना १९९९ व २००४ च्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. लाखनीतील सहकार महर्षी गोविंद निंबेकर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे होते. दोन्ही निवडणुकात त्यांना दुसऱ्या क्रमांकाचे मत मिळाले. १९८० च्या निवडणुकीत केसलवाडा (वाघ)चे काशिनाथ वाघाये अपक्ष उमेदवार होते. त्यांना ११ हजार १७६ मत मिळाली होती. केसलवाडा (वाघ) येथील मधुकर बेदरकर १९७८ ला आमदार बनले होते. साकोली विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीत लाखनीे शहराकडे दुर्लक्ष झाले. शहरातील एकाही काँग्रेस व भाजपा कार्यकर्त्यांना आमदारकी मिळविता आली नाही. साकोली विधानसभा क्षेत्रावर साकोलीचे प्रभूत्व राहिले. शामरावबापू कापगते १९६७ व डॉ.हेमकृष्ण कापगते १९९० व १९९५ मध्ये आमदार राहिले. जनसंघाचे कार्यकर्ते व भाजपाचे नेते गोविंद निंबेकर यांच्यामुळे लाखनीचे नाव चर्चेत राहिले. त्यानंतर लाखनी शहरातील एकही नेतृत्व आमदाराकीपर्यंत पोहचू शकले नाही. केसलवाडा राजकारण्यांचे गावतालुक्यातील केसलवाडा (वाघ) एक लहानशे खेडेगाव आहे. येथील मधुकर बेदरकर १९७८ ला साकोली क्षेत्राचे आमदार बनले होते. १९९९ व २००४ मध्ये सेवक वाघाये विजयी झाले. १९८० ला काशिनाथ वाघाये अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते.