विजेच्या दरवाढीबाबत निवेदन

By Admin | Updated: June 25, 2016 00:30 IST2016-06-25T00:30:02+5:302016-06-25T00:30:02+5:30

विजेच्या दरवाढीसंदर्भात विदर्भ राज्य आंदोलन समिती भंडारा जिल्याच्या वतीने जिल्हा प्रभारी व कोर कमिटी सदस्य ...

Request for electricity tariff | विजेच्या दरवाढीबाबत निवेदन

विजेच्या दरवाढीबाबत निवेदन

भंडारा: विजेच्या दरवाढीसंदर्भात विदर्भ राज्य आंदोलन समिती भंडारा जिल्याच्या वतीने जिल्हा प्रभारी व कोर कमिटी सदस्य माजी आमदार अ‍ॅड. आनंदराव वंजारी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हाधिकारी भंडारा यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी युवा जिल्हाध्यक्ष तुषार हटेवार,जिल्हा उपाध्यक्ष वासुदेवराव नेवारे, शहर अध्यक्ष प्रमोद मानापुरे, भंडारा तालुका अध्यक्ष प्रा. प्रेमलाल लांजेवार, जिल्हा कोषाध्यक्ष अर्जुन सूर्यवंशी, युवा मिडिया अध्यक्ष सारंग तिडके, भंडारा शहर उपाध्यक्ष दामोदर क्षीरसागर, भाऊराव येळणे, रमेश भद्रे व इतर विदर्भवादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Request for electricity tariff