शेतकऱ्यांना मारक ते तीन कायदे रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST2021-02-05T08:41:46+5:302021-02-05T08:41:46+5:30

मोहाडी : शेतकऱ्यांच्या हिताचे नसलेले केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीचे निवेदन ...

Repeal three laws that kill farmers | शेतकऱ्यांना मारक ते तीन कायदे रद्द करा

शेतकऱ्यांना मारक ते तीन कायदे रद्द करा

मोहाडी : शेतकऱ्यांच्या हिताचे नसलेले केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीचे निवेदन प्रधानमंत्री भारत सरकार यांना तहसीलदार मोहाडी यांच्यातर्फे राष्ट्रवादी पक्ष तालुका मोहाडी निवेदन दिले.

शेतकरी ते कृषी कायदे रद्द व्हावेत यासाठी दोन महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. भांडवलदारांच्या हित जपणारे ते कायदे आहेत. तसेच गैस, डिझेल, पेट्रोलच्या दरवाढीचा प्रभाव सर्वसामान्य जनतेवर होत आहे. गरीब-सामान्य लोकांचे बजेट बीघडले आहे. तरी केंद्र शासनाने ते कृषी कायदे मागे घ्यावे तसेच भाववाढीला लगाम घालावा, अशी मागणी मोहाडी तालुका राष्ट्रवादी पक्षाने निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना खुशाल कोसरे, शहर अध्यक्ष पुरुषोत्तम पात्रे, विजय पारधी, बबलू सय्यद ,नरेश ईश्वरकर, झगडू बुधे, मनीषा गायधने, प्रवीण साठवणे, मदन गडरिये, संपत भोयर, प्रभाकर नीमजे, सुरेंद्र वंजारी, मनोहर हेडावू, पांडुरंग निखारे, प्रवीण हेडावू, हितेश साठवणे, विनोद भोयर, पवन चव्हाण, जयपाल खोकले, रवींद्र बसीने, ज्ञानेद्र आगाशे, तारा हेडावू, अनुप थोटे, मीनीज शेख आदी उपस्थित होते.

Web Title: Repeal three laws that kill farmers