शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

माहिती अधिकाराचा अतिरेक

By admin | Updated: March 3, 2016 00:51 IST

सामान्य माणसाला माहिती अधिकार कायद्यामुळे मोठा आधार प्राप्त होऊन प्रशासनात पारदर्शकता आली.

अधिकारी, कर्मचाऱ्यांत असंतोष : तुमसर तालुक्यातील प्रकारतुमसर : सामान्य माणसाला माहिती अधिकार कायद्यामुळे मोठा आधार प्राप्त होऊन प्रशासनात पारदर्शकता आली. शासन व प्रशासनात गतीमानता आली, परंतु या कायद्याचा काहींनी अतिरेक केल्याचे तुमसर शहर व तालुक्यात दिसून येत आहे. काहीही संबंध नसतांनी अनेक विभागात माहिती मागणाऱ्यानी अधिकारी व कर्मचाऱ्यांना नाकीनऊ आणले आहे. त्यामुळे येथे असंतोषाचा भडका उडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.माहिती अधिकार कायदा सन २००५ मध्ये अस्तित्वात आला. सरंक्षण व इतर गोपनीय विभागाची माहिती व्यतिरिक्त सर्वसामान्यांना माहिती विचारण्याचा व प्राप्त करण्याचा हक्क या कायद्याने प्राप्त करुन दिला. माहिती अधिकार कार्यकर्ते तथा सर्वसामान्य नागरिक येथे तशी माहिती संबंधित विभागाकडून घेतात. माहिती प्राप्त करुन देणे हे प्रत्येक विभागाचे काम आहे. पंरतु काहीनी येथे एक सवय म्हणून काहीही संबंध नसतानी माहिती अधिकाराचा अर्ज करण्याचा सपाटाच लावला आहे. यात शाळा, महाविद्यालय, नगरपरिषद, तहसील कार्यालय, भूमि अभिलेख कार्यालय, शासकीय रुग्णालये यांच्याकडे माहिती अधिकाराचे अनेक अर्ज सादर केले जात आहेत. कवडीमोल संबंध नसतानी माहिती अधिकारांचे अर्ज सादर का केले जात आहेत हा संशोधनाचा विषय आहे. संबंधित विभागाला महत्वपूर्ण कामे सोडून माहिती देण्याचेच काम सध्या संपत नाही असे चित्र दिसत आहे. या माहिती अधिकार अर्जामुळे अनुदानीत शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जी माहिती मागितली नाही ती माहिती येथे माहिती अधिकार कार्यकर्ते मागीत आहेत हे विशेष. यात संबंधित शाळेची रोस्टरची साक्षांकित केलेली प्रत, शिक्षकांना संबंधित विभागाने दिलेली मान्यतेची प्रत अशांचा समावेश माहिती अधिकार कार्यकर्त्यांने मागितली आहे. माहिती अधिकाराचे प्रेणेते अण्णा हजारे यांनी सर्वसामान्याकरिता माहिती मागण्याकरिता हा अतिशय महत्वाचा कायदा शासनाची दोन हात करुन मिळवून दिला होता. हे विशेष. सध्या तुमसर शहर व तालुक्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांत या प्रकारामुळे असंतोष दिसत असून असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)