शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्र परिचारिकेच्या भरवशावर

By admin | Updated: September 27, 2014 23:10 IST

लक्षाधीश रुपये खर्च करून मोहदुरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज अशी भव्य इमारत तयार करण्यात आली. सर्व सोयीयुक्त असे आरोग्य केंद्र तर तयार झाले. मात्र त्यामाने याठिकाणी रुग्णांना पाहिजे

मोहदुरा : लक्षाधीश रुपये खर्च करून मोहदुरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज अशी भव्य इमारत तयार करण्यात आली. सर्व सोयीयुक्त असे आरोग्य केंद्र तर तयार झाले. मात्र त्यामाने याठिकाणी रुग्णांना पाहिजे त्या प्रमाणात योग्य सेवा मिळत नाही. नाव मोठे दर्शनखोटे याप्रमाणे येथील आरोग्य केंद्राची अवस्था आहे. याठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर फक्त ओपीडी पुरतेच हजर राहतात. रात्रीला मात्र डॉक्टरांचा थांगपत्ताच नसतो. रात्रीला येणाऱ्या इमरजन्सी रुग्णांची मात्र गैरसोय होत असते. रुग्णांना आल्यापावली परत जावे लागते.मोहदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाच उपकेंद्र येतात. यामध्ये सिरसी, कोथुर्णा, मोहदुरा, दाभा व गणेशपूरचा समावेश आहे. तसेच २९ गावे आणि ६० हजाराच्या जवळपास नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे मोहदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे मुख्य केंद्र आहे. परंतु येथील आरोग्य केंद्र शोभेचे असून नागरिकांना वेळेवर उपचार करण्यास येथील डॉक्टर असमर्थ ठरत आहेत.येथील आरोग्य केंद्रात एकूण चार परिचर कार्यरत आहेत. यापैकी तीन महिला परिचर आहेत. दिवसा एक पुरुष परिचर व एक महिला परिचर राहते. रात्रीला फक्त हिला परिचर आपले कर्तव्य बजावत असतात. रात्रीला इतर महिला परिचराव्यतिरिक्त याठिकाणी इतर कर्मचारी तसेच डॉक्टर कुणीच राहत नाही. अनेकदा रात्रीला भेट दिली असता डॉक्टरसाहेब वैगेरे कुणीच नाही, असे सांगितले जाते. गावात आरोग्य केंद्र असून गावातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. यापेक्षा दुसरे दुर्देव्य कोणते. पण याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना आरोग्य विभागाचे. परंतु या सगळ्यामध्ये गरीब नागरिकांचे मात्र मोठे नुकसान आहे. रुग्णांच्या खासगी दवाखान्यात जाण्यास पर्यायच उरत नाही. अशातच नागरिकांच्या मनात रोष दिसून येते.