शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

By admin | Updated: October 13, 2014 23:17 IST

बुधवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाकडून पुर्ण तयारी करण्यात आली आहे. तीन विधानसभा क्षेत्रात १,१७० मतदान केंद्र असून ५,६४० कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

१,१७० मतदान केंद्र : दोन हजार पोलीस कर्मचारी तैनातभंडारा : बुधवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाकडून पुर्ण तयारी करण्यात आली आहे. तीन विधानसभा क्षेत्रात १,१७० मतदान केंद्र असून ५,६४० कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालेला आहेत. निवडणुकीदरम्यान प्रत्येक घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.यावेळी त्या म्हणाल्या, तुमसर, भंडारा व साकोली या तीन विधानसभा क्षेत्रात ९ लाख १९,८८१ मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडावी यासाठी ५,६४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय १११ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तिनही विधानसभा क्षेत्रात १,१७० ईव्हीएम मशीनची पुर्तता करण्यात आलेली आहे. मतदान केंद्रापर्यंत आवश्यक साहित्यांसह कर्मचारी पोहचावे, यासाठी निवडणूक विभागाने ३०२ वाहनांची व्यवस्था केली आहे. निवडणूक कार्यात कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचारी मतदारांना ८,५०८ टपाली मतपत्रिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. यात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात सहा उपविभागीय पोलीस अधिकारी, १९ पोलीस निरीक्षक, ९६ पोलीस उपनिरीक्षक, १ हजार ५५६ पोलीस कर्मचारी, ६४५ होमगार्ड आदींसह १०३ जीपगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. भंडारा विधानसभा क्षेत्राचे साहित्य वितरण पोलीस कल्याण सभागृहातून होणार आहे. साकोलीचे साहित्य शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सेंदुरवाफा येथून तर तुमसरचे साहित्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथून होणार आहे. तिनही विधानसभा क्षेत्रातील व्होटर स्लिपचे वाटप करण्यात आले आहे. सार्वत्रिक निवडणूक असल्याने निवडणूक आयोगाने सार्वजनिक सुट्टी जाहिर केली आहे. या सुटीचा लाभ उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडील परिपत्रकानुसार दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृह, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल, रिटेलर्स आदी आस्थापनामध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. पत्रपरिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षक कैलास कणसे, निवडणूक अधिकारी मिलींद बन्सोड, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन, विजय देवळीकर, किसन शेंडे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)