शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशातून रॉकेलची सर्रास तस्करी

By admin | Updated: October 29, 2014 22:44 IST

मागील अनेक महिन्यापासून गोबरवाही तथा तुमसर परिसरात मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात रॉकेलची तस्करी सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. तुमसर-बालाघाट आंतरराज्यीय महामार्गावरील

तुमसर : मागील अनेक महिन्यापासून गोबरवाही तथा तुमसर परिसरात मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात रॉकेलची तस्करी सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. तुमसर-बालाघाट आंतरराज्यीय महामार्गावरील सीमा सताड उघडल्या असल्याने या तस्करांचे फावत आहे.राज्य शासनाने रॉकेलचा पुरवठा कमी केल्यानेच महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील आंतरराज्यीय टोळीने राूकेलची तस्करी सुरू केली आहे. सीमेकडील मध्यप्रदेशातील अनेक लहान गावातील नागरिकांकडून ही टोळी अत्यल्प किंमतीस रॉकेल खरेदी करणे तसेच स्थानिक दुकानदारांकडूनही रॉकेल खरेदी करून ते रॉकेल नाकाडोंगरी मार्गे गोबरवाही व तमसरात आणले जात आहे. तुमसर-नाकाडोंगरी, तुमसर-बपेरा, तुमसर-रामटेक, तुमसर-तिरोडा या मार्गावर धावणाऱ्या तीनचाकी व चारचाकी वाहनात सर्रास रॉकेलचा वापर केला जातो. ट्रॅक्टर व डिझेल इंजिनमध्ये सुद्धा सर्रास रॉकेलचा उपयोग सुरू आहे.तुमसर तालुक्यात काळ्याबाजारातील रॉकेलची किंमत अधिक आहे. पुरवठा कमी असल्याने तो सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे तस्करांनी मध्यप्रदेशातून रॉकेलची तस्करीकडे आपला मोर्चा वळविला आहे. दुधाच्या प्लॉस्टीक डब्यातून, टीनाचे डब्बे, आॅईलच्या डब्यातून हा रॉकेल आणला जातो. चारचाकी वाहनातून रॉकेलची खेप मध्यरात्री व पहाटे येथे पोहचते, अशी माहिती आहे. वाहनात व हॉटेलात रॉकेलचा वापर करणारे ग्राहक रात्रीच घटनास्थळी गोळा होेवून रॉकेलची खरेदी करतात. नगदी व धोकारहीत व्यवसाय म्हणून तस्करांनी आपला मोर्चा या व्यवसायाकडे वळविला आहे.सर्वसामान्य जनतेला या तस्करीची माहिती निश्चितच आहे. परंतु टोळीने व्यवसाय करणाऱ्याच्या विरोधात कुणी समोर येत नाही. गावातील प्रतिष्ठीत नागरिकही मूग गिळून गप्प आहेत. काही ठिकाणी या तस्करांचे रिटेलर सुद्धा आहेत, अशी माहिती आहे. अन्न पूरवठा विभागाने आतापर्यंत येथे धडक दिली नसून कधीच कारवाई केल्याचे ऐकीवात नाही. (तालुका प्रतिनिधी)