शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

भाकपचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 21:50 IST

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डाव्या पक्षाच्या ‘संविधान बचाव व धर्मनिरपेक्षता दिन आणि महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या राज्यव्यापी ग्रामपंचायत स्तरीय आंदोलनाचा समापन’ यानिमित्ताने गुरुवारला भाकप कार्यालय साकोली येथून मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देसाकोली तहसीलदारांना निवेदन : आठवडाभरात मागण्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डाव्या पक्षाच्या ‘संविधान बचाव व धर्मनिरपेक्षता दिन आणि महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या राज्यव्यापी ग्रामपंचायत स्तरीय आंदोलनाचा समापन’ यानिमित्ताने गुरुवारला भाकप कार्यालय साकोली येथून मोर्चा काढण्यात आला.‘संविधान बचाव, देश बचाव धर्मनिरपेक्षता दिन जिंदाबाद’ आदी घोषणा देत मोर्चा तहसिल कार्यालयावर पोहचल्यावर मोर्च्याचे रुपांतर धरणे आंदोलनात करण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व शिवकुमार गणविर, शांताराम शेंडे, राजु बडोले, दिलीप उंदिरवाडे किशोर बारस्कर, केशव भेंडारकर, झाडु वासनीक, बाबुराव मेश्राम, शैलेश गणविर यांनी केले. धरणे आंदोलनासमोर नेत्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर एका शिष्टमंडळाद्वारे तहसीलदार अरविंद हिंगे यांना मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.निवेदनात, रोजगार हमी कायद्यांर्गत नमुना ४० चे अर्ज उपलब्ध करुन देणे, सर्व गरजुंना घरकुल देणे, प्रति रेशन कार्ड ३५ किलो रेशन, केरोसिन, साखर व इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणे, श्रावण बाळ, संजय निराधार योजनेचे अर्थसहाय्य दरमहा एक हजार रुपये व वयोमर्यादा ६० वर्ष करावी, उज्वला योजनेला सबसिडी द्यावी, वनाधिकार कायद्यांतर्गत विनाअट पट्टे देण्यांत यावे, साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयाची दुर्दशा सुधारावी, राष्ट्रीय महामार्ग व इतर मार्गावरील गतिरोधकांवर काळे पांढरे संकेत पट्टे करावे, साकोली नगर परिषदेचे उपाध्यक्षांच्या तिसरे अपत्याची हेतुपुर्वक नोंद केली नसल्याप्रकरणी उपाध्यक्ष व नगर परिषद अधिकाऱ्यांविरुध्द कारवाई करावी, आलेबेदर येथील काबिलकास्त जमीनी मुळ लाभार्थ्यांच्या ताब्यात द्यावी, नागझीरा रोडवरील भूखंड पाडुन विक्री होत असलेली काबिलकास्त जमीन सरकारजमा करुन सरकारी ताबा करावा, साकोली नगरीत मंजुर विकास कामे सुरु करावी, कृषीपंपाचे विनारिडींग बिल देऊ नये, रेतीअभावी बांधकाम बंद असल्यामुळे बांधकाम कामगारांवर उपासमारी आली तेव्हा रेतीघाट सुरु करावे आदी मागण्यांचा समावेश होता.मागण्यांबद्दल आठवडाभरात कारवाई करण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी दिले. मोर्चामध्ये जिल्ह्यातील भाकपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.