पावसाने शेवटच्या चरणात गाठली सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 05:00 AM2021-09-26T05:00:00+5:302021-09-26T05:00:11+5:30

जिल्ह्यात मृग नक्षत्रातील पावसानंतर शेतकऱ्यांना आकाशाकडे पाहण्याची वेळ आली हाेती. पावसाने दडी मारल्याने राेवण्या रखडल्या हाेत्या. मध्यंतरी हलक्या सरी बरसत हाेत्या. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी राेवणी केली. मात्र, बहुतांश राेवणी रखडली हाेती. दरम्यान झालेल्या पावसाने राेवणी पूर्ण झाली; परंतु त्यानंतर पुन्हा पावसाने पाठ फिरविली. यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत पडला.

Rainfall reached an average in the last phase | पावसाने शेवटच्या चरणात गाठली सरासरी

पावसाने शेवटच्या चरणात गाठली सरासरी

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना बसत आहे. यंदाही या लहरीपणाचा फटका बसला. हवा तेव्हा पाऊस बरसला नाही आणि आता शेवटच्या चरणात धाे-धाे बरसत आहे. गत पंधरा दिवसांत २१५ मिमी पाऊस काेसळला असून आतापर्यंत जिल्ह्यात ११३५.२ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. या पावसाने जवळजवळ सरासरी गाठली असली तरी हलक्या धानाला मात्र फटका बसत आहे.
भंडारा जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते २५ सप्टेंबर या कालावधी १२४१ मिमी पाऊस अपेक्षित असताे. शनिवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात ११३५.२ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. हा पाऊस विद्यमान सरासरीच्या ९१ टक्के आहे. विशेष म्हणजे १० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात केवळ ८७ टक्के सरासरी पावसाची नाेंद झाली हाेती. मात्र, शेवटच्या चरणात जाेरदार पाऊस बरसला. त्यामुळे सरासरी वाढली आणि प्रकल्पही तुडुंब भरले आहेत.
जिल्ह्यात मृग नक्षत्रातील पावसानंतर शेतकऱ्यांना आकाशाकडे पाहण्याची वेळ आली हाेती. पावसाने दडी मारल्याने राेवण्या रखडल्या हाेत्या. मध्यंतरी हलक्या सरी बरसत हाेत्या. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी राेवणी केली. मात्र, बहुतांश राेवणी रखडली हाेती. दरम्यान झालेल्या पावसाने राेवणी पूर्ण झाली; परंतु त्यानंतर पुन्हा पावसाने पाठ फिरविली. यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत पडला. १० सप्टेंबरनंतर पावसाला पुन्हा प्रारंभ झाला. मात्र, या पावसाचा फटका हलक्या धानाला बसला. लाेंब्या आलेला धान जमिनीवर झाेपला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. गत आठवड्यात तर माेहाडी आणि तुमसर तालुक्यात अतिवृष्टी झाली. या शेवटच्या चरणातील पावसाने सरासरी गाठली. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. धान काढणीला आला असताना पाऊस काेसळत असल्याने नुकसान हाेण्याची माेठी भीती आहे.

सर्वाधिक पावसाची नाेंद माेहाडी तालुक्यात
- जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस माेहाडी तालुक्यात १४४३.८ मिमी काेसळला आहे. हा विद्यमान सरासरीच्या १२२ टक्के आहे. त्या खालाेखाल साकाेली तालुक्यात १२२०.९, लाखनी ११९३.३, लाखांदूर ११०५.६, तुमसर ९७६.६ आणि भंडारा तालुक्यात ९६७.३ मिमी पाऊस काेसळला.  २१ सप्टेंबर राेजी तर माेहाडी तालुक्यावर आभाळच फाटले हाेते. अवघ्या २४ तासांत १४०.५ मिमी पावसाची नाेंद झाली.  इतर तालुक्यातही समाधानकारक पाऊस झाला आहे.

 

Web Title: Rainfall reached an average in the last phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.