‘जय’च्या शोध मोहिमेत पावसाचा व्यत्यय

By Admin | Updated: September 27, 2016 00:33 IST2016-09-27T00:33:11+5:302016-09-27T00:33:11+5:30

‘जय’ या वाघाच्या शोधात राज्यातील वनधिकारी जंगल पालथे घालण्याकरिता सोमवार सकाळी निघाले.

Rain interruption in 'Jai' search operation | ‘जय’च्या शोध मोहिमेत पावसाचा व्यत्यय

‘जय’च्या शोध मोहिमेत पावसाचा व्यत्यय

वनविभाग व्यस्त : दहाही वनपरिक्षेत्रात शोधमोहीम
तुमसर : ‘जय’ या वाघाच्या शोधात राज्यातील वनधिकारी जंगल पालथे घालण्याकरिता सोमवार सकाळी निघाले. बुधवारपर्यंत तीन दिवस जंगल पिंजून काढणार आहे. सोमवारी पावसामुळे शोध मोहिमेला काही काळ ब्रेक लावला. पाऊस सुरू असतानाही जयची शोध मोहिम सुरूच होती.
आशियातील मोठा वाघ म्हणून जयची नोंद आहे. जयचा शोधाकरिता राज्य व केंद्र शासनाने निर्देश दिले. केंद्र शासनाने एका वाघाकरिता अशी मोहिम राज्यातच नाही तर देशात प्रथमच राबविली आहे. वनपरिक्षेत्राधिकारी, एसीएफ, तथा वनमजूरही या मोहिमेत सहभागी आहे. सोमवारी तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगातील नाकाडोंगरी, लेंडेझरी वनपरिक्षेत्रात जयची शोध मोहिमेला सुरुवात झाली. नाकाडोंगरी परिसरात एसीएफ कोडापे, वनपरिक्षेत्राधिकारी एम. एन. माकडे, अड्याळ क्षेत्रात वनपरिक्षेत्राधिकारी प्रमोद महेशपाठक यांच्यासह मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांनी जंगल पिंजून काढला. वादळी पावसाला सुरुवात झाली तरी जंगल पिंजून काढण्यात आले. पावसामुळे वन्यप्राणी फिरत नाही. मंगळवार व बुधवारी पुन्हा सकाळपासून जयची शोध मोहिमेला सुरुवात होणार आहे. नाकाडोंगरी परिसरातील गोबरवाही रेल्वे स्थानकाजवळ दोन दिवसापूर्वी वाघ दिसला होता. झंझेरिया, पांगळी, कारली येथे वाघांचे वास्तव आहे. त्यामुळे या जंगलात शोध मोहिमेतून काय साध्य होते ते कळणार आहे. उमरेड - कऱ्हांडला जंगलातील जय हा शेवटच्या टोकावरील जंगलात येण्याची शक्यता कमी आहे. पंरतु वनखाते मात्र जयचा शोधात आहे हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Rain interruption in 'Jai' search operation