शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
2
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
3
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
4
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
5
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
6
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
7
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
8
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
9
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
10
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
11
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
12
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
13
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
14
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
15
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
16
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
17
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
18
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
19
Monsoon 2026 Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

रबी पिकांना अवकाळी पावसाचा जबर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 05:00 IST

भंडारा शहरात मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल तासभर पाऊस कोसळत होता. तर बुधवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास अचानक पावसासह गारांचा वर्षाव झाला. तुमसर तालुक्यात मंगळवारी रात्री गारांसह जोरदार पाऊस झाला. यामुळे रबी पिकांची प्रचंड हानी झाली.

ठळक मुद्देगारांचा वर्षाव : गहू, हरभरा झोपला, धानाचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी जिल्ह्यात गारांसह झालेल्या अवकाळी पावसाचा रबी पिकांना फटका बसला. जिल्ह्यातील काही भागात गहू, हरभरा झोपला असून उन्हाळी धानाचे मोठे नुकसान झाले. भंडारा शहरासह ठाणा, अड्याळ, तुमसर, पालांदूर, साकोली, मोहाडी आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
भंडारा शहरात मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल तासभर पाऊस कोसळत होता. तर बुधवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास अचानक पावसासह गारांचा वर्षाव झाला. तुमसर तालुक्यात मंगळवारी रात्री गारांसह जोरदार पाऊस झाला. यामुळे रबी पिकांची प्रचंड हानी झाली. शेतात गहू, चना, हरभरा आणि भाजीपाल्याचे पीक असून ते पूर्णत: भूईसपाट झाले. गत आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे. दोन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास हलक्या सरी कोसळत आहेत. मंगळवारी रात्री जोरदार पावसाला सुरुवात झाली. आष्टी परिसरात गारांसह दमदार पावसाने हजेरी लावली.
पवनी तालुक्यात काही भागात जोरदार पाऊस झाला. अड्याळ परिसरात झालेल्या पावसाने कापणीला आलेल्या गहू पिकाचे मोठे नुकसान झाले. आधीच शेतकरी अवकाळी पावसाने धास्तावले असताना आता पुन्हा या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. आसगाव परिसरात रविवारपासून दररोज पाऊस कोसळत आहे. रविवार, सोमवार, मंगळवार या तीन दिवसात झालेल्या पावसाने रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. गहू, हरभरा, वाटाणा, उडीद, मुग, लाखोळी या पिकांना फटका बसला. भंडारा तालुक्यातील जवाहरनगर ठाणा परिसरात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास गारांसह पाऊस झाला. यात ३० ते ४० शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले. या परिसरात गहू गर्भावस्थेत असून त्याचे मोठे नुकसान झाले. संबंधित तलाठी सर्वेक्षण करीत आहेत. लाखांदूर तालुक्यात होळीच्या पूर्वसंध्येला आणि १० मार्च रोजी सायंकाळी अवकाळी पाऊस पडल्याने रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. सध्या रबी पिकांची कापणी झाली असून अनेक शेतकरी मळणीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र अवकाळी पावसाने काढलेले पीक ओले झाले असून अनेक शेतकºयांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. आधारभूत खरेदी केंद्रावर असलेल्या धानालाही मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील कºहांडला येथे वाटाणा पिकाचे मोठे नुकसान झाले.

भंडारा शहरात गारांचा वर्षाव
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार गत तीन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण आहे. मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तब्बल एक तास मेघगर्जनेसह पाऊस कोसळला. बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात होऊन काही भागात गारांचा वर्षाव झाला. ढगाळ वातावरण आणि दिवसा तापणाºया उन्हाचा आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.
भंडारा तालुक्यातील खरबी (नाका) परिसरात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता गारांसह अवकाळी पावसाने थैमान घातले. खराडी, चिखली, राजेदहेगाव परिसरातील गहू, हरभरा पीक भूईसपाट झाले. गत महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने हरभरा पिकाचे नुकसान झाले होते. आता उरलेला हरभरा या पावसात भूईसपाट झाला आहे.