शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
3
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
4
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
5
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
6
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
7
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
8
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
9
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
10
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
11
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
12
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
13
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
14
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
15
मराठा समाजासाठी आमच्या एवढे काम कोणी केले नाही काेणतीही याेजना बंद नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
16
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
17
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
18
भारत-नेदरलँड्स यांच्यात १७ करारांवर स्वाक्षऱ्या; पंतप्रधान मोदी-रॉब जेटेन यांच्यात धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी केलेला धान साठविण्याचा प्रश्न कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात भात हे प्रमुख पीक असून लागवड लायक क्षेत्र दोन लाख सात हजार हेक्टर आहे. भात लागवडीखालील एक लाख ७७ हजार क्षेत्र आहे. जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये एक लाख ४३ हजार मेट्रिक टन धानाची खरेदी करण्यात आली होती. यावर्षीही धानाचे चांगले पीक येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअपूरे गोदाम : पणन महामंडळाची क्षमता केवळ तीन हजार मेट्रिक टन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : धान विकण्यासाठी शेतकऱ्यांची आधारभूत खरेदी केंद्रावर प्रचंड गर्दी झाली असून खरेदी केलेला धान साठविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.राज्य सहकारी पणन महामंडळाकडे केवळ तीन हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम असून उर्वरित धान भाडे करारावर घेतलेल्या गोदामात ठेवले जातात. साठवण क्षमतेअभावी धान खरेदी संथ गतीने होत असून याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
भंडारा जिल्ह्यात भात हे प्रमुख पीक असून लागवड लायक क्षेत्र दोन लाख सात हजार हेक्टर आहे. भात लागवडीखालील एक लाख ७७ हजार क्षेत्र आहे. जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये एक लाख ४३ हजार मेट्रिक टन धानाची खरेदी करण्यात आली होती. यावर्षीही धानाचे चांगले पीक येण्याची शक्यता आहे. बाजारात व्यापाऱ्यांकडून लूट होत असल्याने शेतकरी आपला धान आधारभूत केंद्रावरच विकत आहे. मात्र खरेदी केलेला धान साठविण्याचा मोठा प्रश्न आहे. जिल्ह्यात केवळ नऊ हजार मेट्रिक टन तांदूळ साठविण्याची क्षमता राज्य शासनाच्या गोदामाची आहे. त्यात राज्य सहकारी पणन महामंडळाकडे स्वत:चे केवळ तीन हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम आहे. त्यामुळे खाजगी गोदाम भाड्याने घेवून धान साठविला जातो. परंतू खाजगी गोदाम केवळ दोन महिन्यासाठी भाडे करारावर घेण्याचा नियम आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पिकलेला धान साठवायचा कसा अशा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे. परंतु धानाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना दहा ते पंधरा दिवस प्रतीक्षा करावी लागते. या संथगती मागील कारण अपुरे गोदाम असल्याचे बोलले जाते. भात पीक निघाल्यानंतर साठवणुकीचा प्रश्न दरवर्षी निर्माण होतो.
परिणामी शेतकऱ्यांना नाईलाजास्तव मिळेल त्या भावात आपला धान व्यापाऱ्याला विकावा लागतो. व्यापाºयांकडे सुध्दा धान साठविण्याची क्षमता नसल्याने ते जिल्ह्याबाहेर धान साठवितात.

गोदामांच्या प्रस्तावाला मंजुरी
गत वर्षी जिल्ह्यात अतिरिक्त ९००० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी शासनस्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी साकोली, लाखनी, आमगाव (पवनी) येथील ४००० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदाम बांधकाम प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. मात्र अद्यापही या कामाला सुरुवात झाली नाही.
तात्काळ भरडाई ठरू शकते उपाय
शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला आणि गोदामात साठविलेला धान तात्काळ भरडाईसाठी गेल्यास गोदाम रिकामे होऊन नवीन धान साठविण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. गतवर्षी याच पद्धतीने नियोजन करण्यात आले होते. मात्र यावर्षी पुन्हा तोच प्रश्न निर्माण झाला असून धान तात्काळ भरडाईसाठी देण्याची आवश्यकत आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड