शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 05:00 IST

शेतकऱ्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पोलीस बंदोबस्ताची मागणी केली. ही मागणी मंजूर केल्यानंतर बुधवारी सकाळी लाखांदूर पोलीस ठाण्याचे हवालदार दिलीप भोयर आणि महिला शिपाई सरिता मदनकर बंदोबस्तासाठी गेले. महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उकीरडा व हातपंप हटविण्याचे काम सुरू असताना या पाच जणांनी अडथळा आणून पोलिसाला धक्काबुक्की केली. याप्रकरणी लाखांदूर ठाण्यात तक्रार दाखल केल्यावरून गुन्हा नोंदविला.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतातील उकीरडा आणि हातपंप हटविण्यासाठी तहसीलदारांच्या आदेशावरून बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला पाच जणांनी धक्काबुक्की करण्याची घटना तालुक्यातील किन्ही (गुंजेपार) येथे बुधवारी सकाळी १०.३० वाजता घडली. याप्रकरणी पाचजणांविरुद्ध लाखांदूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.होमकांत इसन दानी (६७), भोजराज इसन दानी (५५), चंद्रकिरण होमकांत दानी (३६), वसंत सुरेश दानी (३४), महेश सुरेश दानी (२८, सर्व राहणार किन्ही) अशी पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. किन्ही येथील दुलिचंद इसन दानी या शेतकऱ्याच्या शेतजमिनीवर उकीरडा व हातपंप आहे. हा उकीरडा व हातपंपाच्या मालकीवरून होमकांत दानी यांच्यासोबत वाद सुरू होता. याप्रकरणी लाखांदूर तहसीलदारांनी दुलिचंद दानी यांच्या बाजूने आदेश पारीत केला. तसेच शेतातील उकीरडा व हातपंप हटविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शेतकऱ्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पोलीस बंदोबस्ताची मागणी केली.ही मागणी मंजूर केल्यानंतर बुधवारी सकाळी लाखांदूर पोलीस ठाण्याचे हवालदार दिलीप भोयर आणि महिला शिपाई सरिता मदनकर बंदोबस्तासाठी गेले. महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उकीरडा व हातपंप हटविण्याचे काम सुरू असताना या पाच जणांनी अडथळा आणून पोलिसाला धक्काबुक्की केली. याप्रकरणी लाखांदूर ठाण्यात तक्रार दाखल केल्यावरून गुन्हा नोंदविला.

पाचही जणांना अटक

-  बंदोबस्तातील पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी लाखांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. ठाणेदार रमाकांत कोकाटे यांनी शासकीय कामात अडथळा व धक्काबुक्कीप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर या पाचही जणांना किन्ही गुंजेपार येथे जाऊन अटक केली. पोलिसांना केलेल्या या धक्काबुक्कीने लाखांदूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस