शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

बारा पाेलिसांसह ५१ जणांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 05:00 IST

जिल्ह्यात अलीकडे अपघाताचे प्रमाण वाढले असून त्यात दुचाकीच्या अपघाताची संख्या अधिक आहे. हेल्मेट न वापरल्याने अपघातात गंभीर जखमी हाेवून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही जिल्ह्यात माेठी आहे. हा प्रकार राेखण्यासाठी जिल्हा पाेलीस अधिक्षकांनी आपल्या अधिनस्थ पाेलिसांना दुचाकी चालविताना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. अनेक पाेलीस गणवेशात आणि साध्या वेशात विनाहेल्मेट दुचाकी चालविताना दिसून येतात.

ठळक मुद्देहेल्मेट सक्ती : २५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

  लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या १२ पाेलिसांसह ५१ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपयाप्रमाणे २५ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. जिल्हा पाेलीस अधिक्षक वसंत जाधव यांनी पाेलिसांना हेल्मेट घालणे सक्तीचे केले असून लवकरच जिल्हृ्यातील नागरिकांनाही हेल्मेट सक्तीचे केलेे जाणार आहे. 
जिल्ह्यात अलीकडे अपघाताचे प्रमाण वाढले असून त्यात दुचाकीच्या अपघाताची संख्या अधिक आहे. हेल्मेट न वापरल्याने अपघातात गंभीर जखमी हाेवून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही जिल्ह्यात माेठी आहे. हा प्रकार राेखण्यासाठी जिल्हा पाेलीस अधिक्षकांनी आपल्या अधिनस्थ पाेलिसांना दुचाकी चालविताना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. अनेक पाेलीस गणवेशात आणि साध्या वेशात विनाहेल्मेट दुचाकी चालविताना दिसून येतात. या कायद्याची अमलबजावणी स्वत:पासून करता यावी यासाठी पाेलीस अधिक्षकांनी सर्वप्रथम पाेलीस दलातील कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती केली. त्याबाबतचे आदेश देवून काटेकाेर अमंलबजावणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पाेलीस मुख्यालयाच्या गेटजवळ विशेष माेहिम राबविण्यात आली. पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहनांचे मुळ कागदपत्रे चेक करुन हेल्मेटचा वापर न करणाऱ्या पाेलिसांवर वाहतूक नियंत्रण शाखेचे पाेलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी कारवाईकेली. 
या माेहिमेत हेल्मेट न घालता दुचाकी चालविणारे बारा पाेलीस आढळून आले. तर ३९ इतर नागरिक असे ५१ व्यक्तीं विराेधात कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. आता जिल्ह्यातील नागरिकांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात येणार असून वाहतूक नियंत्रण शाखा पथक तयार करुन कारवाईचे सत्र सुरु ठेवणार आहे.

दुचाकी अपघातामागे हेल्मेट नसणे आणि माेबाईल बाेलणे हे मुख्य कारण आहे. हेल्मेट नसल्यामुळे अनेक व्यक्ती गंभीररित्या जखमी हाेवून मृत्यूमुखी पडतात. जिल्हा पाेलीसदलातील कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनीही नियमांचे पालन करावे.
- वसंत जाधव,
पाेलीस अधिक्षक भंडारा

टॅग्स :Policeपोलिस