शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

सिहोरा येथे जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:01 IST

४७ गावांची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या सिहोरा गावात शनिवार दिनी आठवडी बाजार राहत असल्याने नागरिक गर्दी करीत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती नाकारता येत नाही. गावात आणि परिसरात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. याशिवाय परिसरातील गावात एका सामाजिक कार्यकर्त्यांचा या आजाराने नागपुरात उपचार दरम्यान मृत्यू झाला. यामुळे कोरोनाच्या प्रसारावर आळा घालण्यासाठी व्यापारी संघटनेने दर शनिवारला व्यापार नगरी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देउत्स्फूर्त प्रतिसाद । व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांच्या एकजूटपणाची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात आणि गावात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. या आजाराचे रुग्ण आढळून आले असल्याने सिहोरा गावात दर शनिवारला व्यापारी संघटनेने जनता कर्फ्यू आणि लॉकडाऊन घोषित केल्याने नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे.
४७ गावांची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या सिहोरा गावात शनिवार दिनी आठवडी बाजार राहत असल्याने नागरिक गर्दी करीत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती नाकारता येत नाही. गावात आणि परिसरात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. याशिवाय परिसरातील गावात एका सामाजिक कार्यकर्त्यांचा या आजाराने नागपुरात उपचार दरम्यान मृत्यू झाला. यामुळे कोरोनाच्या प्रसारावर आळा घालण्यासाठी व्यापारी संघटनेने दर शनिवारला व्यापार नगरी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. याशिवाय अन्य दिवस व्यापार करतांना फिजीकल डिस्टन्सिंग व मास्क विना ग्राहकांना साहित्य विक्री करण्यात येऊ नये, अशा सुचना देत शनिवारपासून गावात जनता कर्फ्यू व लॉकडाऊन घोषित करण्यात आले. सकाळपासून संपुर्ण व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहे. गावातील नागरिकांनी बाहरे फिरण्याचे टाळले आहे.
गावात बँक, पतसंस्थाचे कार्यालय सुरु ठेवण्यात आले असता ग्राहक मात्र दिसून आले नाही. औषधी दुकाने व खाजगी वैद्यकीय सेवा जनता कर्फ्यूमधून वगळण्यात आले आहे. गावात असणारे मद्य विक्रीची परवानाधारक दुकाने, बार, भोजनालय मालकांनी जनता कर्र्फ्यूमध्ये सहभाग घेतला आहे. यामुळे गावात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. व्यापारी यंत्रणेने गावात भ्रमंती करीत व्यापारी व दुकानाची चौकशी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या