वेतन पथकातील अनियमितता रोखणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:56 IST2019-10-15T00:55:50+5:302019-10-15T00:56:53+5:30
यावेळी सभेला मार्गदर्शन करतांना धार्मिक यांनी तालुका संघटन मजबुत करण्याबाबत माहिती दिली. धनंजय तिरपुडे यांनी आपल्या मार्गदर्शनात संघटनेचे महत्व व कार्यप्रणाली तसेच जिल्हा मुख्याध्यापक संघ मजबूत करून मुख्याध्यापकांच्या समस्या कशाप्रकारे सोडवता येतील याबाबत मार्गदर्शन केले.

वेतन पथकातील अनियमितता रोखणार
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : वेतन पथक (माध्यमिक) भंडारा येथे लहान - सहान बाबींमुळे वेतन बिल परत केले जाते. वेळेवर वेतन केले जात नाही. अंशदान निवृत्ती योजनेत गोंधळ चालला आहे. वेतन पथकाचे काम पारदर्शक, वेळेत व्हावे यासाठी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना भेटून नियमितता रोखली जाणार, असे मुख्याध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष राजू बालपांडे यांनी प्रतिपादन केले .
भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाची संघटनात्मक बांधणी, मुख्याध्यापकांच्या अडचणी, जिल्हा अधिवेशनाची तयारी या विषयी लाखनी येथे मुख्याध्यापक संघाची तालुका सभा सिद्धार्थ विद्यालय सावरी येथे जिल्हा अध्यक्ष राजू बालपांडे यांच्या अध्यक्षताखाली घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय तिरपुडे जिल्हा कार्यवाह जी.एन. टिचकुले, हरिदास भुरे, मनीष वंजारी, प्रमोद धार्मिक, डोंगरे उपस्थित होते.
सभेत शिक्षण शुल्क, शिष्यवृत्ती देयक, डीसीपीएस, जीपीएफ पावत्या वाटप तसेचविविध विषयावर चर्चा करण्यात आली. मनीष वंजारी यांनी मागील सभेचे इतिवृत्त सभेपुढे सादर केले. यावेळी तालुक्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक भैसारे, खोटेले, कामथे, हेमने, धकाते यांचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त करतांनी विविध अडचणीवर मात करत आपले कर्तव्य पार पाडून सेवानिवृत्त होणे हे अतिशय सुखद असल्याचे सांगितले.
यावेळी सभेला मार्गदर्शन करतांना धार्मिक यांनी तालुका संघटन मजबुत करण्याबाबत माहिती दिली. धनंजय तिरपुडे यांनी आपल्या मार्गदर्शनात संघटनेचे महत्व व कार्यप्रणाली तसेच जिल्हा मुख्याध्यापक संघ मजबूत करून मुख्याध्यापकांच्या समस्या कशाप्रकारे सोडवता येतील याबाबत मार्गदर्शन केले.
जी.एन. टिचकुले यांनी वेतन पथक अधीक्षक यांच्या सोबत झालेल्या बैठकीतील माहिती दिली. तसेच जिल्हा व राज्य अधिवेशनबाबत चर्चा केली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमार बालपांडे यांनी तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत आश्वासन दिले. जिल्हा व राज्यस्तरीय अधिवेशनाला जास्तीत जास्त मुख्याध्यापकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रास्ताविक हरीदास भुरे सभेला नाकाडे, निंबार्ते , बोदेले, गद्रे, गिºहेपुंजे, मांडवटकर उपस्थित होते. प्रास्ताविक हरीदास भुरे यांनी केले. संचालन प्रवीण गजभिये यांनी तर महेंद्र राऊत उपस्थितांचे आभार व्यक्त केले. यावेळी जिल्ह्यातील मुख्यापकांची उपस्थित होते