लाखांदूर येथे दमदार पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST2021-06-05T04:25:48+5:302021-06-05T04:25:48+5:30

तालुक्यात गत दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावली. २ जून रोजी तालुक्यात ५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर गुरूवार ...

Presence of heavy rains at Lakhandur | लाखांदूर येथे दमदार पावसाची हजेरी

लाखांदूर येथे दमदार पावसाची हजेरी

तालुक्यात गत दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावली. २ जून रोजी तालुक्यात ५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर गुरूवार ३ जून रोजी २९.३ मिमी पाऊस कोसळला. लाखांदूर, लाखनी आणि पवनी तालुक्यात गत दोन दिवसात पाऊस बरसल्याची नोंद घेण्यात आली. गुरूवारी वीज कोसळून तालुक्यात एक गाय ठार झाली होती. दरम्यान शुक्रवारी दुपारी ३.३० वाजताचे सुमारास वादळासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे धान कापणी आणि माळणीच्या कामांचा खोळंबा झाला. आधारभूत केंद्र तालुक्यात सुरू न झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा धान उघड्यावर आहे. त्यालाही मोठा फटका बसला. तर साकोली ते वडसा रस्त्यासाठी लाखांदूर शहरात ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. पावसाचे पाणी या खड्ड्यात साचल्याने अर्जुनी मोर फाट्याजवळ पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. साचलेल्या पाण्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

===Photopath===

040621\177-img-20210604-wa0042.jpg

===Caption===

रस्ता बांधकामाने लाखांदुर येथे निर्माण झालेली पुर परिस्थिती

Web Title: Presence of heavy rains at Lakhandur