जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तालुकानिहाय आराखडा तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 05:00 IST2021-09-26T05:00:00+5:302021-09-26T05:00:16+5:30

उन्हाळ्याच्या कालावधीत ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण होते. त्याअनुषंगाने पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव तयार करा व बंद असलेल्या योजना सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिले. बंधारे बांधून पाणी पातळी वाढवता येईल. त्याअनुषंगाने सर्व विभागांनी कार्यवाही करावी व कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देशआमदार नाना पटोले यांनी दिले.

Prepare taluka wise plan for overall development of the district | जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तालुकानिहाय आराखडा तयार करा

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तालुकानिहाय आराखडा तयार करा

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडणे गरजेचे आहे. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी तालुकानिहाय कृती विकास आराखडा तयार करा, असे निर्देश काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विविध विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, उपवनसंरक्षक एस. बी. भलावी, जिल्हा जलसंधारण अधिकारी  अनंत जगताप उपस्थित होते. घरकुल हा गोरगरीब नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. घरकुल योजनेचा लाभापासून गरीब व गरजू लाभार्थी वंचित राहू नये, यासंबंधी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. घरकुलाचे बांधकाम करताना जागेचा प्रश्न निर्माण होतो. त्याअनुषंगाने झुडपी जंगल व गावठाणाची जागा मिळण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
उन्हाळ्याच्या कालावधीत ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण होते. त्याअनुषंगाने पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव तयार करा व बंद असलेल्या योजना सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिले. बंधारे बांधून पाणी पातळी वाढवता येईल. त्याअनुषंगाने सर्व विभागांनी कार्यवाही करावी व कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले.

कीडींचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी उपाययाेजना करा
खरीप हंगामात सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकावर प्रादुर्भाव झाल्याच्या अनेक तक्रारी येत असून, त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या. धान पिकावर खोडकीडा व इतर रोगांच्या अनुषंगाने औषधसाठा उपलब्धतेचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. रासायनिक खतांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. रासायनिक खतांचा काळाबाजार करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आल्याचे कृषी विभागातर्फे बैठकीत सांगितले. तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव आता नसला, तरी पुढील काळात आल्यास त्यावर उपाय योजना करण्यात याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
 

Web Title: Prepare taluka wise plan for overall development of the district