शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांनी घेतली विद्यार्थ्यांची प्रार्थना

By admin | Updated: September 23, 2016 00:42 IST

बिनाखी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षक वेळेवर हजर होत नसल्याने विद्यार्थी आणि गावकरी त्रस्त झाली आहे.

चुल्हाड (सिहोरा) : बिनाखी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षक वेळेवर हजर होत नसल्याने विद्यार्थी आणि गावकरी त्रस्त झाली आहे. शाळेच्या वेळेत गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांची प्रार्थना घेतल्याचा प्रकार २१ ला सकाळी ११ वाजता उघडकीस आला आहे. यामुळे शिक्षकांविषयी गावकऱ्यांत रोष निर्माण झाला आहे. तुमसर-बपेरा राज्य मार्गावर असलेल्या दीड हजार लोकवस्तीच्या बिनाखी गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून १ ते ४ तुकड्या आहेत. या तुकड्यात ६१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शिवाय ३ शिक्षक कार्यरत आहेत. परंतु या शाळेत शालेय वेळेत शिक्षक हजर होत नाही. शाळेत विद्यार्थी ९ वाजेच्या सुमारास हजेरी लावतात. परंतु या विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवणारे कुणी राहत नाही. शाळेच्या आवारात खुली विहीर आहे. यामुळे विद्यार्थ्यांना या विहिरींचा धोका आहे. ९ ते ११ वाजेपर्यंत कुणी शिक्षक हजर होत नसल्याने दोन तास विद्यार्थी सैरवैर राहत आहे. शालेय वेळेत शिक्षक हजर होत नसल्याने एरवी विद्यार्थीच प्रार्थना होत आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून हा प्रकार शाळेत सुरू असताना शिक्षण समितीचे पदाधिकारी मुग गिळून गप्प आहेत. कार्यरत शिक्षकाचे वास्तव्य भंडारा, तुमसरात आहेत. यामुळे या शिक्षकांचे अपडावून सुरू आहे. २१ ला १० वाजेच्या सुमारास शाळेच्या आवारात शिक्षकांचे अनुपस्थितीत विद्यार्थी प्रार्थना घेतल्याचे काही गावकऱ्यांना दिसले. गावातील उपसरपंच देवेंद्र शिक्षक हजर झाले नाही. शाळा कुलूप बंद असल्याने विद्यार्थी सैर वैर खुल्या विहीर नजिक खेळत होते. ही विहीर विद्यार्थ्यांचे जिविताला धोकादायक असल्याचे कारणावरून देवेंद्र मेश्राम व प्रफुल बघेले यांनी विद्यार्थ्यांना नियमात ठेवले नंतर ११ च्या सुमारास शिक्षक शाळेत हजर झाले. उशिरा शाळेत हजेरी लावत असल्याचा जाब विचारण्यात आला असता शिक्षक शांत होते. आज गुरूवारला सुद्धा शिक्षक वेळेवर हजर झाले नसल्याने गावकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात तक्रार दिली आहे. या संदर्भात अधिक माहिती व प्रतिक्रियासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका गौरी गायधने यांना संपर्क साधले असता होवू शकला नाही.