वीज खांबाने उड्डाणपुलाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST2019-10-30T05:00:00+5:302019-10-30T05:00:23+5:30

मुंबई - हावडा रेल्वे मार्गावर रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर तुमसर-गोंदिया-रामटेक राष्ट्रीय महामार्गावर प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम सध्या रखडले आहे. रेल्वे ट्रॅकच्या मधोमध विजेचा खांब येथे प्रमुख अडथळा बनला आहे. २५ हजार वॅटची ही वीज वाहिनी आहे. २४ तासात येथून २१५ रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे वीज खांब हटविण्याकरिता येथे अडथळा निर्माण झाला आहे.

The power pole kept the flight work going | वीज खांबाने उड्डाणपुलाचे काम रखडले

वीज खांबाने उड्डाणपुलाचे काम रखडले

ठळक मुद्देरेल्वे प्रशासनापुढे पेच : मेगा ब्लॉकनंतर कामाला होणार सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : जागतिक दर्जाच्या सुविधा व गतीमान प्रशासनाचा दावा रेल्वे प्रशासनाकडून केला जातो. परंतु मागील एक वर्षापासून रेल्वे ट्रॅक मधोमध असलेल्या विजेच्या खांबाचा अडथळा रेल्वे प्रशासनाने अद्यापपर्यंत दूर केला नाही. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम रखडले आहे.
मुंबई - हावडा रेल्वे मार्गावर रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर तुमसर-गोंदिया-रामटेक राष्ट्रीय महामार्गावर प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम सध्या रखडले आहे. रेल्वे ट्रॅकच्या मधोमध विजेचा खांब येथे प्रमुख अडथळा बनला आहे. २५ हजार वॅटची ही वीज वाहिनी आहे.
२४ तासात येथून २१५ रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे वीज खांब हटविण्याकरिता येथे अडथळा निर्माण झाला आहे.
रेल्वेचे अभियंते येथे प्रयत्नशील आहेत. परंतु त्यांना अद्याप यश आले नाही.
 

लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे
च्रेल्वे प्रशासन व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येत आहे.
त्यामुळे गतीमान बांधकामाकरिता खा.सुनील मेंढे तथा नवनिर्वाचित आमदार राजू कारेमोरे यांनी येथे पुढाकार घेण्याची गरज आहे.

गडरकरिता पिल्लर बांधकाम
रेल्वे ट्रॅकवर सीमेंट काँक्रीटचे गडर ठेवण्यात येणार आहेत. त्याकरिता खाली सीमेंट काँक्रीटचे दोन पिल्लरचे बांधकाम येथे शिल्लक आहे. वीज तारामुळे पिल्लरचे काम थांबविण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासन येथे मेगा ब्लॉक घेतल्यानंतर सीमेंट पिल्लरचे काम करणार असल्याची माहिती आहे. पर्यायी दोन लोखंडी खांब आठ दिवसापूर्वी येथे उभे करण्यात आले आहेत.

Web Title: The power pole kept the flight work going