शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तिन्ही क्षेत्रात अनपेक्षित निकालाची शक्यता

By admin | Updated: October 18, 2014 01:07 IST

तब्बल २५ वर्षानंतर सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणूक स्वतंत्ररित्या लढविली आहे. त्यामुळे

भंडारा : तब्बल २५ वर्षानंतर सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणूक स्वतंत्ररित्या लढविली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या संभाव्य निकालाचे अंदाज बांधताना राजकीय पंडित आणि शासनाच्या गुप्तचर विभागाचीही दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. एकूणच रविवारला मतमोजणीच्या दिवशी धक्कादायक निकाल येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कोणतीही निवडणूक म्हटली की, त्याची बेरीज वजाबाकी, अंदाज सांगणाऱ्यांची कमी नसते. प्रत्येकच गावात असे काही तज्ज्ञ असतात. या तज्ज्ञांना मतदारसंघातील कोण माणूस कुणाचे काम करू शकतो, अखेरच्या क्षणी कुणी कोणते चिन्ह चालविले, कुणाची हवा होती आणि कोण कोणत्या क्रमांकावर राहू शकतो, याची इत्यंभूत माहिती असते. त्यासाठी ते निवडणुकीच्या पुर्वीपासूनच आकडेमोड करीत असतात. अशा निवडणुकांचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे स्थानिक पातळीवरील या तज्ज्ञांचे अंदाज बहुतांश वेळा खरे ठरतात, असे अंदाज खरे ठरणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढी असते. निवडणूक झाली की, प्रत्येकच उमेदवार अशा तज्ज्ञांकडून अंदाज ऐकण्यासाठी उत्सुक असतो. यापूर्वीचे अंदाज खरे निघाले म्हणून उमेदवारांनाही या तज्ज्ञांच्या गणितीय कौशल्यावर विश्वास असतो. परंतु, यावेळी या तज्ज्ञांचे गणितीय अंदाजही कोलमडण्याची चिन्हे आहेत. मागील दोन दशकात पहिल्यांदाच या तज्ज्ञांमध्ये संभ्रमावस्था पहायला मिळत आहे. १५ वर्षानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी तर २५ वर्षानंतर भाजपा व शिवसेना या पक्षांनी स्वतंत्ररित्या निवडणुका लढविल्या आहेत. प्रत्येक मतदारसंघात भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षाच्या उमेदवाराशिवाय बसपा, मनसे या पक्षांसह अपक्ष उमेदवार एकमेकांच्या विरोधात रिंगणात होते. यावेळसारखी विचित्र राजकीय परिस्थिती कधीही निर्माण झालेली नाही. भल्याभल्यांना या निवडणुकीचे अंदाज बांधणे कठिण होऊन बसले आहे. कारण प्रत्येकच मतदारसंघात किमान तिरंगी सामना पहायला मिळत आहे. तुमसर, भंडारा आणि साकोली या तिन्ही मतदार संघामध्ये तिरंगी लढती आहेत. या तिन्ही मतदारसंघात विजयी उमेदवार काठावर निघेल, असे मानले जात आहे. भंडारा जिल्ह्यात कोण कमी आणि कोण अधिक, याचा अंदाज बांधला जात आहे. मतदानाची टक्केवारी, झालेले मतदान आणि मतदानाच्या रात्री घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर या जागांवरील तज्ज्ञांचा दावाही संभ्रमात सापडला आहे. ते पाहता या विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता आहे. रविवारला (दि.१९) सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.राजकीय तज्ज्ञच नव्हे तर महाराष्ट्र पोलीस दलाच्या राज्य गुप्त वार्ताविभाग यावेळी पहिल्यांदाच संभ्रमात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी आपले अहवाल पाठविले असले तरी संभाव्य विजयी उमेदवार म्हणून सूचविलेल्या नावांबाबत ते स्वत:च साशंक असल्याचे चित्र पहायला मिळाले. यावरून यावेळच्या निवडणुका गुप्तचरांसोबतच दीर्घ अनुभवी राजकीय दिग्गजांची परीक्षा पाहणाऱ्या ठरणाऱ्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)