शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

तामसवाडी रेतीघाटावर पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST

तुमसर तालुक्यातील तामसवाडी रेतीघाटातून रेतीचा अवैध उपसा सुरु असल्याची माहिती तुमसर पोलिसांना प्राप्त झाली. बुधवारी पहाटे पोलीस उपनिरीक्षक शिखरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तामसवाडी घाटावर धाड मारली. त्यावेळी सहा ट्रॅक्टर घाटावर उभे होते. त्यापैकी तीन ट्रॅक्टरमध्ये रेती भरलेली होती. त्या तीन ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर इतर तीन ट्रॅक्टर रिकामे असल्याने त्यांची चौकशी सुरु आहे.

ठळक मुद्देतीन ट्रॅक्टर जप्त : तिघांवर तुमसरमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : लॉकडाऊनचा फायदा घेत तालुक्यातील तामसवाडी रेतीघाटातून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन सुरु असून बुधवारी पहाटे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सहा ट्रॅक्टर घेण्यात आले. यापैकी तीन ट्रॅक्टरचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर उर्वरीत तीन ट्रॅक्टरची चौकशी सुरु आहे.तुमसर तालुक्यातील तामसवाडी रेतीघाटातून रेतीचा अवैध उपसा सुरु असल्याची माहिती तुमसर पोलिसांना प्राप्त झाली. बुधवारी पहाटे पोलीस उपनिरीक्षक शिखरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तामसवाडी घाटावर धाड मारली. त्यावेळी सहा ट्रॅक्टर घाटावर उभे होते. त्यापैकी तीन ट्रॅक्टरमध्ये रेती भरलेली होती. त्या तीन ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर इतर तीन ट्रॅक्टर रिकामे असल्याने त्यांची चौकशी सुरु आहे.सहापैकी केवळ दोनच ट्रॅक्टरवर क्रमांक असून इतर चारवर क्रमांक नसल्याचे पुढे आले. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक निखील सुरेश कोहळे, राहुल कोडे (पचारा), राजेश मुंडे (पचारा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने जिल्ह्यातील रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. तुमसर तालुक्यासोबतच इतर रेती घाटावरही मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन सुरु आहे.नागरिकांच्या माहितीवरून कारवाईतामसवाडी येथील रेतीघाटावर मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरु असल्याची माहिती तुमसर पोलिसांना नागरिकांना दिली होती. त्यावरून सापळा रचून कारवाई करण्यात आली. लॉकडाऊन काळात अवैध रेती उत्खनन व वाहतूक सुरु असून यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत आहे. परंतु याकडे कुणाचेही लक्ष नाही. महसूल आणि पोलीस प्रशासन कोरोना संसर्ग प्रतिबंध उपाययोजनेत व्यस्त असल्याचा फायदा रेतीतस्कर घेत असल्याचे सर्वत्र दिसत आहे.

टॅग्स :sandवाळू