किटाडीच्या कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST2021-06-09T04:43:34+5:302021-06-09T04:43:34+5:30

खुशाल जयदेव गवळे (४५), देवराम श्रीराम निनावे (५२), धर्मराज विक्रम धुळसे (३०), सत्यवान आनंद धोटे (३५), अंकित हरिराम निनावे ...

Police raid Kitadi's chicken market | किटाडीच्या कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

किटाडीच्या कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

खुशाल जयदेव गवळे (४५), देवराम श्रीराम निनावे (५२), धर्मराज विक्रम धुळसे (३०), सत्यवान आनंद धोटे (३५), अंकित हरिराम निनावे (२०), सुधाकर लक्ष्मण निपाने (६०) सर्व राहणार किटाडी आणि दुर्गेश हेमराज टिचकुले (३०) रा.पेंढरी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जयवंत चव्हाण यांना किटाडी शिवारात कोंबडबाजार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक विवेक राऊत यांच्या पथकाला धाड टाकण्याचे निर्देश दिले. सोमवारी धाड टाकली असता तेथे कोंबड्यांच्या पायाला धारदार काती बांधून कोंबड्यांची झुंज सुरू असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी सात जणांना अटक केली. तसेच तीन जखमी कोंबडे व इतर साहित्य असा पाच हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे जयवंत चव्हाण, विवेक राऊत, सुनील उईके, भित्रे, भानारकर यांनी केली.

Web Title: Police raid Kitadi's chicken market