शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस शिपायाकडून युवतीची फसवणूक

By admin | Updated: June 29, 2016 00:33 IST

पोलीस शिपाई असलेल्या युवकाने लग्नच्या आणाभाका देऊन युवतीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. दरम्यान विवाहाबाबत तो नेहमी ....

विवाहानंतर नांदवायला तयार नाही : पीडित युवतीची मदतीची मागणीमोहाडी : पोलीस शिपाई असलेल्या युवकाने लग्नच्या आणाभाका देऊन युवतीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. दरम्यान विवाहाबाबत तो नेहमी उडवाउडवीचे उत्तर देवू लागल्याने युवतीने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यामुळे युवकाने मंदिरात लग्न उरकविले. पण तिला पत्नी म्हणून नांदवायच्या ऐवजी सोडून पळ काढल्याने मला पत्नीचा हक्क मिळवून द्यावा, अशी मदत आता युवती मागत आहे.तालुक्यातील सकरला येथील गुरूदेव धनराज शेंडे हा युवक भंडारा पोलीस दलात कार्यरत आहे. त्याचे एका युवतीवर प्रेम जडले. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्तापित केले. युवतीने वारंवार विवाह करण्याची गळ त्याला घातली. मात्र, तो नेहमी उडवाउडवीचे उत्तरे देवू लागल्याने तीने आंधळगंव पोलिसात त्याच्याविरूध्द तक्रार दाखल केली. नौकरी जाईल या भीतीने त्याने युवतीशी मंदीरात लग्न केले. त्यानंतर त्याने तिला पत्नी म्हणून स्विकार करण्याऐवजी तिच्या पासून दूर राहू लागला. त्यामुळे पीडित विवाहिता पुन्हा पोलिसात पोहचली.तत्पूर्वी गुरूदेवने तिला लग्न करण्याचे आमिष देवून भंडारा, खिंडसी, रामटेक येथील लॉजवर तथा अन्य ठिकाणी नेवून वारंवार तिच्यावर अत्याचार केला. मात्र लग्नासाठी टाळाटाळ करू लागल्याने त्या युवतीने आंधळगाव पोलिसात तक्रार केली. पोलिसांनीही दोघांना समजावून तक्रार दाखल केली नाही. दोघांचा विवाह एका मंदिरात पार पडला. लग्न करून आई-वडिलांचा विरोध असल्याने आंधळगाव येथे एक दिवस सोबत घालविला. त्यानंतर पोलीस प्रशिक्षणासाठी जायचे असल्याचा बहाना करून पत्नीला तिच्या मावशीच्या घरी ठेवले. चार महिन्यात फक्त एकदाच भेटायला आला. खोलीचे भाडे व जेवणाचा खर्च सुद्धा दिला नाही. वैतागुन त्या युवतीने सरळ पोलीस मुख्यालय गाठून त्या युवकाला जाब विचारले असता युवकाने तिच्याशी कोणताही संबंध ठेवण्यास नकार दिल्याने ती निराश झाली. त्यानंतर ती आई व बहिणीला घेवून गुरूदेवच्या घरी गेली व पत्नी म्हणून स्विकार करण्याची विनंती केली. मात्र पती गुरूदेव, सासरे, धनराज शेंडे, सुनिता शेंडे, विजू रतिराम डोये, छाया शेंडे, रिना शेंडे, दयाराम डोये यांनी एकत्र येवून तिघांनीही मारहाण करून घरातून हाकलून लावले. याची तक्रारसुद्धा आंधळगाव पोलिसात करण्यात आली. मात्र पोलिसांनी पती पत्नीचे प्रकरण समजून हे प्रकरण महिला समुपदेशन केंद्राकडे वर्ग केले. सध्या ती युवती माहेरी वैफल्यग्रस्त जीवन जगत आहे. गुरूदेवमुळे एका तरूणीचे जीवन उध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे. अन्यायग्रस्त युवतीने सदर माहिती पत्ररिषदेत कथन करून पत्नीचा हक्क् मिळवून द्यावा, अशी विनवनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)