शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

अपघात प्रकरणात पोलिसांची दिरंगाई

By admin | Updated: March 2, 2016 01:19 IST

एम.आय.डी.सी. जवळ झालेल्या अपघातात मोहाडी पोलिसांनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच अपघात करणाऱ्या वाहनाचा शोध लागलेला नसून पुढे शोध लागेल...

पत्रपरिषदेत जनतेचा आरोप : प्रकरण मोहाडीजवळील अपघाताचे मोहाडी : एम.आय.डी.सी. जवळ झालेल्या अपघातात मोहाडी पोलिसांनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच अपघात करणाऱ्या वाहनाचा शोध लागलेला नसून पुढे शोध लागेल की नाही असा आरोप पत्रपरिषदेत जनतेने केला आहे.१७ फेब्रुवारीला रात्री ११ ते ११.३० वाजेदरम्यान एम.आय.डी.सी. जवळील पेट्रोलपंपासमोर विश्वास मदन निमजे (२९) याच्या सायकलला मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात विश्वास निमजे याच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. गंभीर अवस्थेत त्याला नागपुरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान १८ फेब्रुवारीला सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. अपघात घडल्यावर ग्रामीण रुग्णालय मोहाडीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.हंसराज हेडाऊ यांनी दूरध्वनीवरून अपघाताची माहिती मोहाडी पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र स्टेशन डायरीवर असलेल्या पोलिसाने या घटनेला गांभीर्याने घेतले नाही आणि तशी नोंद सुद्धा केली नाही. त्यामुळे अपघात करणारे वाहन पळून जाण्यात यशस्वी झाले. १७ फेब्रुवारीला रात्री कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायाने सूचना देऊनही नोंद केली नाही व तब्बल दोन दिवसानंतर रिपोर्ट दाखल करण्यात आल्या प्रकरणी त्या शिपायाला निलंबित करण्यात यावे, शांती ब्राईट बार इंडस्ट्री, एम.आय.डी.सी. मोहाडी येथे शिफ्ट संपल्यावर सायरन वाजवला जात नाही. त्यामुळे या कंपनीवर कारवाई करण्यात यावी. कारण सायरनच्या आवाजाने वाहनांना शिफ्ट संपली असून कामगार बाहेर रस्त्यावर येतील याची माहिती मिळते व अपघात टळू शकते. एम.आय.डी.सी. ते बसस्टॉप मोहाडीपर्यंत वाहनांची वर्दळ राहत असल्याने या भागात पथदिव्यांची व्यवस्था करण्यात यावी. मोहाडी बसस्टॉप चौक येथे सिसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, या रस्त्यावर वनोपज नाका लावण्यात यावा, मोहाडीत बाहेरून आलेल्या लोाकंची नोंद पोलिसांनी करून द्यावी, मृतकाच्या कुटुंबीयाला शासनाने आर्थिक मदत द्यावी आदी मागणी पत्रपरिषदेला नगरसेवक सायत्रा पारधी, नगरसेवक रविकांत देशमुख, नगरसेवक सेवक चिंधालोरे, ग्रा.रु. समिती सदस्य अजय गायधने, सामाजिक कार्यकर्ते सुभाष भाजीपाले, मनीष पराते, नारायण निखारे, विशाल निखारे, धीरज रायकवाड, अजय निनावे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)