शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

वडार, मांग गारुडी समाजाला जातीचे दाखले दया

By admin | Updated: November 22, 2014 00:15 IST

तालुक्यातील मौजा गिरोला येथील वडार समाजाला व कारधा येथील मांग गारुडी समाजाला तात्काळ जातीचे दाखले देण्यात यावे अन्यथा...

भंडारा : तालुक्यातील मौजा गिरोला येथील वडार समाजाला व कारधा येथील मांग गारुडी समाजाला तात्काळ जातीचे दाखले देण्यात यावे अन्यथा १५ डिसेंबर रोजी सामुदायिक आत्मदहन करण्यात येईल. असा इशारा आदिवासी पारधी समाज परिवर्तन फाऊंडेशन परभणीचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.मौजा गिरोला येथील वडार समाजाचे यशवंतराव चव्हाण वसाहत योजनेखाली पुनर्वसन व्हावे याकरिता वेळोवेळी आंदोलने केली. पुनर्वसनाची प्रक्रिया सुरु झाली. परंतु या पुनर्वसनासाठी जातीच्या दाखल्याची आड-काठी येऊ लागली आहे. वडार समाजाला व कारधा येथील मांगगारुडी समाजाला १९६१ चा महाराष्ट्रातील वास्तव्याचा पुरावा मागीतला जात आहे. त्यात जातीचा उल्लेख असतो असे प्रशासनाचे मत आहे. परंतु आमच्या जवळ असलेल्या १९३० च्या शासकिय पुराव्यात जात नावाचा उल्लेख नाही. तरीही त्या व्यक्तिला वडार जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.गिरोला येथील वडार समाजाचे पुनर्वसन करावयाचे असून जातीच्या दाखल्याअभावी त्यांचे पुनर्वसन राहू नये, यासाठी त्यांच्याजवळ ते पुरावे आहेत. त्याच्या आधारावर त्यांना व कारध्याच्या मांगगारुडी समाजाला तात्काळ जातीचे दाखले वितरीत करावेत, या दोन्ही समाजाकडे १९६१ चे कोणतेही अतिरिक्त पुरावे नाहीत. ते देऊच शकत नाहीत. १५ डिसेंबर २०१४ च्या आत वडार व मांग गारुडी समाजाला जातीचे दाखले वितरीत झाली नाही तर वडार समाज व मांगगारोडी समाज सामुदायीक आत्मदहन करेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. गिरोला येथील वडार समाज व कारधा येथील मांग गारोडी समाजाला जातीचे दाखले द्यावे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेखाली तात्काळ पुनर्वसन झालेच पाहिजे, संतोष पवार यांना आदिवासी शबरी घरकुल योजनेतून नझूलच्या जागेवर घर तात्काळ देण्यात यावेत यांचा समावेश आहे.(नगर प्रतिनिधी)