शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंनी मोजले पाण्यासाठी पैसे

By admin | Updated: September 16, 2014 23:32 IST

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात शालेय क्रीडा स्पर्धा सुरू आहे. यात सुविधांचा अभाव असून खेळाडूंना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

ओबडधोबड मैदानात सामने : शालेय क्रीडा स्पर्धेत सुविधांचा अभावभंडारा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात शालेय क्रीडा स्पर्धा सुरू आहे. यात सुविधांचा अभाव असून खेळाडूंना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याने त्यांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहे. यासोबतच मैदान खेळण्यायोग्य नसल्याने इजा होण्याची शक्यता असतानाही वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली नाही.विद्यार्थ्यांच्या अंगातील सुप्त गुणांचा विकास व्हावा यासाठी शालेय शिक्षण मंत्रालयाने शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन सुरू केले आहे. याअनुशंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. आज पहिल्या दिवशी १४, १७ व १९ वयोगटातील शालेय मुली व मुलांच्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या. पावसाळयाचे दिवस असल्याने मागील आठवड्यात भंडारा शहरात पाऊस पडला. दरम्यान क्रीडा संकुलाच्या मैदानावर जनावरे चालले. चार दिवसांपासून पाऊस नसल्याने कडक उन्ह निघले आहे. त्यामुळे जनावरांच्या पायांची खुरे मैदानात स्पष्ट दिसून येत आहे. याच स्थितीत तिथेच क्रीडा स्पर्धा सुरू आहेत.विशेषत: कबड्डी स्पर्धा ओबळ-धोबळ मैदानावर सुरू आहे. कबड्डीचे मैदान पाखन किंवा मऊ मातीने भरणे गरजेचे होते. मात्र क्रीडा विभागाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष करून ओबळ-धोबळ मैदानावरच कबड्डी स्पर्धा घेतल्या. अशावेळी खेळात सर्व्हिस घेऊन जाणाऱ्यास विरूध्द संघांचे खेळाडू मोठ्या शिताफिने पकडण्याचा प्रयत्न करतात. यावेळी खेळाडू तिथे पडून त्याला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच नालीच्या बाजुलाच कबड्डीचे दुसरे मैदान बनविण्यात आले आहे. क्रीडा विभागाने नालीवर फोमची गादी टाकून अपघात होण्याचा संभावित धोका टाळण्याचा प्रयत्न केला असला तरी येथे खेळाडूला खेळादरम्यान इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असले तरी, खेळादरम्यान खेळाडूला इजा झाल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याकडून औषधोपचार करता यावा, यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करणे व अत्यावश्यक सेवा म्हणून रूग्णवाहिका जिल्हा क्रीडा संकुलात ठेवणे गरजेचे होते. मात्र क्रीडा विभागाने याकडे दुर्लक्ष केले. बाहेरगावावरून आलेल्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सुविधा असणे आवश्यक आहे. निवासाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी सुविधांचा अभाव दिसून आल्याने विद्यार्थी व शिक्षकांनी रोष व्यक्त केला. स्पर्धांसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, नास्ता व पाण्याची व्यवस्था नसल्याने अनेक शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:जवळचे पैसे खर्च केले. या स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे वजन करून त्यांना मैदानात उतरविणे गरजेचे होते. १७ वर्ष वयोगटात जिल्हा परिषद शाळा मोहाडी व लाखनी शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या सामन्यात लाखनीच्या खेळाडूंचे वजन करण्यात आले नाही. यात वजन गटाव्यतिरिक्त खेळाडू खेळत असल्याने त्यांचे वजन करावे, अशी मागणी मोहाडीचे शिक्षक एन. एम. बोडणे यांनी केली होती. त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने तिथे शाब्दिक फैरी झाल्या. जिल्हा क्रीडा अधिकारी विभागाने शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन सुरळीत होण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी खेळाडूंनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)