शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
2
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
3
Top Marathi News LIVE Updates: अंबरनाथमध्ये मुख्य जलवाहिनीला मोठी गळती; लादी नाका परिसरात लाखो लीटर पाणी वाया
4
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
5
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
6
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
7
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
8
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
9
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
10
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
11
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
12
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
13
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
14
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
15
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
16
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
17
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
18
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
19
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना धानाचे चुकारे आधारभूत किंमतीनेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून आधारभूत धान खरेदी केंद्रावर पणन महासंघाच्यावतीने धान खरेदीला प्रारंभ झाला. सध्या जिल्ह्यातील ८४ केंद्रावर धान खरेदी सुरु आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २१ लाख १२ हजार १५४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. त्यात सर्वसाधारण ग्रेडचा २० लाख ६६ हजार ९६१ क्विंटल तर अ ग्रेडचा ४५ हजार १९२ क्विंटल धान आहे. या धानाची किंमत आधारभूत किंमती १८१५ प्रमाणे ३८३ कोटी ४४ लाख ६३ हजार ६२३ रुपये आहे.

ठळक मुद्दे२१ लाख क्विंटल खरेदी : कोट्यवधीचे चुकारे थकीत

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासकीय धान खरेदी बंद होण्याला अवघे तीन आठवडे असतांना शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीनेच धान खरेदीचे चुकारे देण्यात येत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. जिल्ह्यात २१ लाख १२ हजार क्विंटल धानाची खरेदी झाली असून त्याची आधारभूत दराने किंमत ३८३ कोटी ४४ लाख रुपये आहे. अद्यापही एकाही शेतकऱ्याला वाढीव दर आणि बोनसनुसार चुकारे दिले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये शासनाकडे थकीत आहेत.
भंडारा जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून आधारभूत धान खरेदी केंद्रावर पणन महासंघाच्यावतीने धान खरेदीला प्रारंभ झाला. सध्या जिल्ह्यातील ८४ केंद्रावर धान खरेदी सुरु आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २१ लाख १२ हजार १५४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. त्यात सर्वसाधारण ग्रेडचा २० लाख ६६ हजार ९६१ क्विंटल तर अ ग्रेडचा ४५ हजार १९२ क्विंटल धान आहे. या धानाची किंमत आधारभूत किंमती १८१५ प्रमाणे ३८३ कोटी ४४ लाख ६३ हजार ६२३ रुपये आहे. आतापर्यंत २७० कोटी ४८ लाख ७० हजार १९९ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. तर ११२ कोटी ९५ लाख ९३ हजार ४२३ रुपयांचे चुकारे बाकी आहेत. विशेष ही सर्व रक्कम आधारभूत किंमतीप्रमाणे आहे.
शासनाने धानाला आधारभूत किंमती १८१५ रुपये घोषित केली. त्यानंतर शासनाने धानाला ५०० रुपये बोनस आणि २०० रुपये प्रोत्साहन असे ७०० वाढीव दर दिले होते. याबाबत घोषणाही करण्यात आली होती. मात्र भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत खरेदी केलेल्या धानाचे चुकारे आधारभूत किंमतीनुसारच म्हणजे १८१५ रुपयाप्रमाणे करण्यात आले. आधारभूत किंमतीचीच ११२ कोटी ९५ लाखांचे चुकाने थकीत आहेत. त्यात ७०० रुपये वाढीव दराची वाढ केल्यास हा आकडा कोट्यवधीच्या घरात जातो. परंतु आतापर्यंत शेतकऱ्यांना वाढीव दरानुसार चुकारेच करण्यात आले नाही. आधीच जिल्ह्यातील शेतकरी आसमानी संकटाचा सामना करीत आहे. शेतकºयांना पैशाची निकड असून धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.

६८ हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा
आधारभूत धान खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील ६८ हजार ४१ शेतकऱ्यांनी आपला धान विकला आहे. आता ३० मार्चपासून धान खरेदी बंद होणार आहे. त्यामुळे धान खरेदी बंद होण्यापुर्वी बोनससह सर्व रक्कमेचे चुकारे व्हावे, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र शासकीय स्तरावर वाढीव ७०० रुपयांच्या रकमेबाबद कोणत्याही हालचाली दिसत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना बोनस आणि वाढीव रकमेसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी