शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

आता ग्रामपंचायत स्तरावर होणार वीज बिलाचा भरणा

By admin | Updated: July 28, 2014 23:23 IST

संग्राम कक्ष जिल्हा परिषद भंडारा यांचे पुढाकाराने अपना सीएससी सेवेतंर्गत ११० ग्रामपंचायत स्तरार २७ प्रकारच्या सेवांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला असून अताा या सेवेत आणखी एका सुविधेची भर पडलेली आहे.

भंडारा : संग्राम कक्ष जिल्हा परिषद भंडारा यांचे पुढाकाराने अपना सीएससी सेवेतंर्गत ११० ग्रामपंचायत स्तरार २७ प्रकारच्या सेवांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला असून अताा या सेवेत आणखी एका सुविधेची भर पडलेली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत मध्ये विज बिल भरणा करण्याची सुविधा अपना सीएससी अंतर्गत सुरू करण्यात आली आहे.जिल्ह्यात सातही तालुक्यात अपना सीएससी सेवेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांचे हस्ते करण्यात आला. सदर सेवेच्या माध्यमातून जिल्ह्यात ११० ग्रामपंचायत स्तरावर २७ सेवांचा लाभ संग्राम केंद्रातून नागरिकांना मिळत आहे. दरम्यान सध्या गाव स्तरावर बिल भरण्याची सुविधा नसल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी येवून बिल भरण्याशिवाय पर्याय नसतो, त्यामुळे येण्या जाण्यात वेळ व पैसा खर्च होत आहे. सध्या अपना सीएससी सेवेचा लाभ घेत असलेल्या भंडारा जिल्ह्यातील पंचायत समिती लाखनी -मुरमाडी तुपकर, रेंगेपार, कोळी कोलारी. लाखांदूर- तावशी, चप्राड, रोहणी. पवनी- अड्याळ, निलज, कोसरा, तुमसर- सिहोरा, खापा, हसारा. मोहाडी- नेरी, मोहाडी, जांब. भंडारा- दाबा, जमनी, सुरेवाडा, पांढराबोडी. साकोली-सासरा, पिंडकेपार, परसटोला आदी ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये विज बिल भरणा करण्याचे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या सेवेमुळे गावस्तरावरील नागरिकांना ग्रामपंचायत मध्येच विज बिल भरता येणार असून त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्याचा त्रास वाचण्यासोबत आर्थिक बचत होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे ग्रामपंचायत स्तरावर विज बिल भरण्याची सेवा सुरू झाल्यामुळे नागरिकांना बिल वेळेवर भरता येत आहे.सध्या स्थितीत एकविस ग्रामपंचायतमध्ये सेवा सुरू झाली असून भविष्यात अधिकच्या असलेल्या ग्रामपंचायतमध्ये या सेवेचा विस्तार करण्याचा प्रयत्न असल्याचे संग्राम कक्षाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक निषुम खरबीकर यांनी सांगितले. या सुविधांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल द्विवेदी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)