देशभक्ती आणि प्रामाणिकपणा हाच देशाच्या प्रगतीचा मूलमंत्र

By Admin | Updated: October 26, 2016 00:46 IST2016-10-26T00:46:05+5:302016-10-26T00:46:05+5:30

‘रामकृष्ण हरी... भारत माता की जय... ज्ञानेश्वर महाराज की जय...’ अशा गजराने कीर्तन जुलबंदीला सुरुवात झाली.

Patriotism and honesty are the words of the country's progress | देशभक्ती आणि प्रामाणिकपणा हाच देशाच्या प्रगतीचा मूलमंत्र

देशभक्ती आणि प्रामाणिकपणा हाच देशाच्या प्रगतीचा मूलमंत्र

धर्म-अध्यात्म : श्रेयस बडवे आणि मानसी बडवे यांची जुगलबंदी
भंडारा : ‘रामकृष्ण हरी... भारत माता की जय... ज्ञानेश्वर महाराज की जय...’ अशा गजराने कीर्तन जुलबंदीला सुरुवात झाली. कीर्तनकार श्रेयस बडवे आणि राष्ट्रीय कीर्तनकार मानसी बडवे यांच्या अनोख्या कीर्तन जुलबंदीचा लाभ भंडारावासीयांना मिळाला.
‘‘भक्त ऐसे जाणा जे देही उदास’’ या तुकाराम महाराजांच्या अभंगांनी जुगलबंदीला सुरुवात झाली. देवाची भक्ती करा. देवाचं नामस्मरण करा हे आपल्या जीवाला मोक्षप्राप्तीसाठी, समाधान प्राप्तीसाठी उपयुक्त आहे. असे प्रतिपादन श्रेयस बडवे यांनी केले.
तर समाधान प्राप्तीसाठी केवळ देवभक्तीच केली पाहिजे, असे नाही. तर देशभक्ती ही तितकीच आवश्यक आहे. देवभक्ती बरोबरच देशभक्तीही आवश्यक असतेच. देवपूजन बराच वेळ घालवण्यापेक्षा तो वेळ जनता जनार्दनासाठी द्यावा, असे मत मानसीताईंनी ठासून मांडले. कोणीतरी बाहेरून येवून आपली सुटका करेल यापेक्षा आपण स्वत: कार्य करणे उपयुक्त असे सांगून मानलीताई यांनी देहावर उदार होणारा देशभक्त हाच देवभक्त असतो तो ही आपल्या कर्माद्वारे सिद्ध होतो.
पूर्वरंगातील आपल्या विषयाचे प्रतिपादन करताना मानसीताईंनी चाफेकर बंधूचे चरित्र अर्थात रँडचा वध ही कथा आवेशपूर्ण मांडली. तर नामस्मरणाद्वारे दामाजीपंत यांनी विठ्ठलाला कसे प्राप्त करून घेतले याचे वर्णन अतिशय भक्तीपूर्ण पद्धतीने मांडले.
या जुगलबंदीत हार्मोनियमवर विठ्ठल दाढी, उपगडे तबल्यावर विनोद पत्थे, राजू नानोटी यांनी सुरेख साथ दिली. संचालन आयोजक मनोज दाढी यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Patriotism and honesty are the words of the country's progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.